फोटो सौजन्य - सोशल मीडिया
वर्ल्ड टेस्ट क्रिकेट फायनल : पाकिस्तान संघ दोन दिवसांपूर्वी निराशाजनक कामगिरीमुळे बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिकेत २-० ने पराभूत करून इतिहास रचला. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये बांग्लादेशने पाकिस्तानला १० विकेट्सने पराभूत करून विक्रम केला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये बांग्लादेशने पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत करून मालिका एकतर्फी नावावर केली आणि बांग्लादेशने पहिल्यांदाच मालिका जिंकली आहे. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला नक्कीच महागात पडणार आहे. त्याच्या या महत्वाच्या कसोटी मालिकेमध्ये त्यांना २-० असा पराभव झाल्यामुळे हळूहळू त्यांचे WTC फायनलचे स्वप्न मोडताना दिसत आहे. आता वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्या संघाना फायनलमध्ये जाण्याची संधी आहे यावर एकदा नजर टाकणार आहोत.
एकदिवसीय वर्ल्ड कप, T२० वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हे आयसीसीचे महत्वाच्या स्पर्धा आहेत. त्यामुळे सर्व संघाचे या तीन मोठ्या स्पर्धांसाठी धावपळ सुरु असते. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश या मालिकेमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या पराभवामुळे संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या गुणांची टक्केवारी आता १९.०५ वर घसरली आहे. पाकिस्तानचे ७ सामन्यांतून दोन विजय आणि ५ पराभवांसह केवळ १६ गुण आहेत. पाहिल्यास, WTC च्या सध्याच्या चक्रात पाकिस्तानचे आणखी सात सामने शिल्लक आहेत. त्याला इंग्लंडविरुद्ध तीन आणि मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याला त्याच्याच भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये भाग घ्यायचा आहे.
या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर भारताचा संघ आहे. भारताच्या संघाचे आतापर्यत ९ सामने झाले आहेत, यामध्ये त्यांनी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे आणि एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यत १२ सामने खेळले यामधील ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ३ सामन्यांमध्ये पराभवच सामना करावा लागला आहे आणि एक सामना अनिर्णयीत राहिला.