फोटो सौजन्य - Lucknow Super Giants/SunRisers Hyderabad सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad will cross the 300-run mark today : आज आयपीएल २०२५ च्या १८ व्या सीझनमध्ये सातवा सामना रंगणार आहे. या सामन्यांमध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधारपद रिषभ पंतकडे आहे तर सनराइजर्स हैदराबादचे कर्णधार पॅट कमिन्सकडे आहे. मागील सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने राजस्थान विरुद्ध झालेला सामन्यात भावांचा पाऊस पाडला होता, या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघ ३०० टप्पा पार करणार का याकडे क्रिकेटच्या त्यांचं लक्ष लागले आहे.
लखनऊ सुपर यांच्या संघाला शेवटच्या षटकांमध्ये दिल्ली कॅपिटल विरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे लखनऊचा संघ पहिला विजयाच्या शोधात आहे. आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे अनेक गोलंदाज हे दुखापतीमुळे संघाबाहेर बाहेर आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्या प्लॅनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण संघाचा मॅच विनर वेगवान गोलंदाज आवेश खान संघामध्ये सामील होणार असे वृत्त समोर आले आहेत. मागच्या सामन्यांमध्ये ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा त्याचबरोबर ईशान शर्मा यांनी मारलेले शतक यावरून सनरायझर्स हैदराबादचा संघ या सीझनमध्ये त्यांचा दबदबा पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळाला आहे.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स संघात अनेक स्फोटक फलंदाज आहेत आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत त्यांना रोखणे सोपे जाणार नाही. आयपीएलच्या इतिहासात आज पहिल्यांदाच एका डावात ३०० धावांचा टप्पा ओलांडला जाईल की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. गेल्या सामन्यात, सनरायझर्सच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना काहीही करू दिले नाही आणि सहा विकेटसाठी २८६ धावा केल्या ज्यामध्ये इशान किशनचे शतक होते. किशन एखाद्या मोहिमेवर असल्यासारखे वाटत होते. मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर त्याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले, त्याने ४७ चेंडूत नाबाद १०६ धावा करताना सहा षटकार आणि ११ चौकार ठोकले.
Matchday Mood: 100% Charged and ready to go again 🔋💪#PlayWithFire | #SRHvLSG | #TATAIPL2025 pic.twitter.com/WPFaJtunEZ
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 27, 2025
ईशान किशन व्यतिरिक्त, सनरायझर्स संघात अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेनसारखे आक्रमक फलंदाज आहेत. एवढेच नाही तर नितीश कुमार रेड्डी यांनी गेल्या सामन्यात धावा काढून दाखवून दिले होते की त्यांना कोणत्याही प्रकारे कमी लेखणे चूक ठरेल. अशा परिस्थितीत, लखनौला गोलंदाजी विभागात स्पष्ट नियोजनासह मैदानात उतरावे लागेल कारण लहान चुका देखील खूप महागात पडू शकतात. गेल्या सामन्यात लखनौला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एका विकेटने पराभव पत्करावा लागला.