फोटो सौजन्य - Sports India
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप : भारतामध्ये क्रिकेट पसंत केले जाते त्याचबरोबर कब्बडी देखील भारतामध्ये पाहिली जाते. पण इतर खेळांना फार काही महत्व दिले जात नाही. सध्या बॅटमिटनचे सामने सुरु आहेत तर काही ठिकाणी आर्चरीचे देखील स्पर्धा सुरु आहेत. त्याचबरोबर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे देखील सामने सुरु आहेत. लिव्हरपूलमध्ये सध्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप सुरू आहे. ज्यामध्ये भारतीय महिला बॉक्सर्सनी उत्तम कामगिरी दाखवली आहे.
भारताच्या मुलींनी आता देशासाठी ४ पदके निश्चित केली आहेत. जास्मिन लांबोरिया जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय ठरली. यानंतर नुपूर शेओरननेही अंतिम फेरीत प्रवेश केला. आता देशाला या दोन्ही बॉक्सर्सकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. त्याच वेळी, मीनाक्षी हुड्डाने उपांत्य फेरीत पोहोचून भारतासाठी चौथे पदक निश्चित केले आहे.
Jaismine enter Final of world Boxing Championship 2025 Jaismine Lamboria beat Omailyn Alcalá (VEN) by 5-0 to enter Women’s 57 kg final She became 7th Indian boxer to reach World Boxing championship final She will face 24 Olympic 🥈 Julia Szeremeta (POL) for gold medal pic.twitter.com/tAqNEeT945 — Sports India (@SportsIndia3) September 12, 2025
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला बॉक्सर जास्मिन लम्बोरियाचा सामना व्हेनेझुएलाच्या अल्कालाशी झाला. सेमीफायनलमध्ये जास्मिनने अल्कालाचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आता अंतिम फेरीत जास्मिनचा सामना पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या ज्युलिया झेरेमेटाशी होईल. महिलांच्या ८० किलो वजनी गटात तुर्कीच्या सेमा दुतातासचा ५-० असा पराभव करून नुपूरने अंतिम फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत नुपूरने सुरुवातीपासूनच तुर्कीच्या बॉक्सरवर वर्चस्व गाजवले. यापूर्वी भारताच्या पूजा राणीने ८० किलो वजनी गटात देशासाठी पदक निश्चित केले होते. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताच्या मीनाक्षीने इंग्लंडच्या अॅलिस पम्फ्रेचा ५-० असा एकमताने पराभव केला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर आता मीनाक्षीचा सामना उपांत्य फेरीत मंगोलियाच्या रौप्यपदक विजेत्या लुत्सैखानी अल्तांटसेत्सेगशी होईल.
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मुलींनी देशाला अभिमानाने गौरव दिला आहे, परंतु भारतीय पुरुष बॉक्सर्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. २०१३ पासून भारतीय पुरुष बॉक्सर्सचा १० सदस्यीय संघ कोणत्याही पदकाशिवाय परतला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही भारतीय पुरुष बॉक्सरला पदक जिंकता आलेले नाही. भारताची स्टार निकहत जरीन हिने देखील निराश केले. तिने पहिला सामना जिंकला होता त्यानंतर तिला दुसऱ्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.






