Yash Dayal (Photo Credit- X)
UP T20 League 2025: आरसीबीचा स्टार आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) विश्वासू गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) संकाट सापडला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर टिकणे आता त्याच्यासाठी अवघड झाले आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये मेरठ मावेरिक्स आणि कानपूर सुपरस्टार्स यांच्यातील पहिल्या सामन्याने सुरुवात होत आहे. मात्र, या स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच क्रिकेटपटू यश दयालसाठी एक मोठा धक्का बसला आहे. गंभीर आरोपांमुळे यश दयालला या लीगमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार, तो आता या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. गोरखपूर लायन्सने यश दयालला ₹७ लाख रुपयांना विकत घेतले होते.
गेली दोन वर्षे क्रिकेटच्या मैदानावर यश दयालची कामगिरी चांगली होती, पण आयपीएल २०२५ नंतर तो सर्वात कठीण काळातून जात आहे. याचं कारण क्रिकेट नाही, तर त्याच्यावर लागलेले गंभीर आरोप आहेत. गाझियाबादमध्ये एका मुलीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला, तर त्यानंतर जयपूरमध्ये दुसऱ्या मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला.
🚨 Cricketer Yash Dayal BANNED from UP T20 League after sexual harassment cases
➡️ UPCA bars him despite ₹7L Gorakhpur Lions contract
➡️ Accused in two cases: Ghaziabad (rape under pretext of marriage) & Jaipur (minor, POCSO Act)
➡️ Allahabad HC gave interim relief in one… pic.twitter.com/tJK60Dnavz
— The Matrix (@thematrixloop) August 16, 2025
गाझियाबादमधील एका महिलेने यश दयालवर लैंगिक शोषणाचा आरोप लावताना काही फोटो शेअर केले आणि म्हटले की, त्याने लग्नाचं खोटं आश्वासन दिलं. या प्रकरणात त्याला अटकेतून दिलासा मिळाला आहे, पण त्यानंतरच जयपूरमध्ये त्याच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली. या प्रकरणात जयपूर उच्च न्यायालयाने क्रिकेटरच्या अटकेवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
याच दरम्यान, उत्तर प्रदेश टी-20 लीगने त्याच्यावर बंदी घातल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप न झाल्यामुळे यूपीसीएने त्याच्यावर बंदी घातली आहे की यश दयालने स्वतःहून या लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दोन्हीपैकी काहीही असो, या आरोपांनंतर यश दयालचा क्रिकेट करियर धोक्यात असल्याचं मात्र निश्चित आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या यश दयालवर जयपूरमध्ये POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा आरोप आहे की, जयपूरमध्ये आयपीएल सामन्यादरम्यान यशने तिला भेटल्यानंतर करियर संबंधित सल्ला देण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिचे लैंगिक शोषण केले. या तक्रारीनुसार, त्यावेळी मुलीचे वय १७ वर्षे होते.