फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Punjab Kings vs Rajasthan Royals 1st innings report : शनिवारचा आज दुसरा सामना सुरु आहे हा सामना पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम सुरु आहे. पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे. आजचा सामना राजस्थान रॉयल्सचा संघ संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात पहिले फलंदाजी करत राजस्थानच्या संघाने पहिल्या डावात १९० धावा केल्या. आता पंजाब किंग्ससमोर 206 धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यांमध्ये यशस्वी जैस्वालने कमालीची फलंदाजी केली आहे. मागील तीन सामन्यांमध्ये केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर आता जैस्वालने पुन्हा फॉर्म मिळवला आहे.
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर यशस्वी जयस्वालने संघासाठी ४५ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्या, यामध्ये त्याने ५ षटकार आणि ३ चौकार मारले. मागील तीन सामन्यांमध्ये त्याने अत्यंत खराब कामगिरी केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजय सॅमसन २६ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. नितीश राणा मागील सामन्यांमध्ये धुव्वादार फलंदाजी केली होती पण या सामन्यात तो मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला त्याने ७ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या.
Innings Break!
With a power-packed final push, #RR post the highest team total at this venue in #TATAIPL 🔥
Will #PBKS chase down a 🎯 of 206? 🤔
Scorecard ▶ https://t.co/kjdEJydDWe#PBKSvRR pic.twitter.com/P0WwRFfiTv
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी रियान परागने २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या यामध्ये त्याने तीन षटकार आणि तीन चौकार ठोकले. त्याचबरोबर सिमरोन हिटमायरने संघासाठी १२ चेंडूंमध्ये वीस धावा केल्या आणि शेवटच्या काही चेंडू खेळण्यासाठी आला होता. त्याने पाच मध्ये तेरा धावा केल्या. पंजाब किंग्ससमोर २०६ धावांचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे पंजाब किंग्सचे फलंदाज कशा प्रकारचे कामगिरी करतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. मागील दोन्ही सामन्यांमध्ये पंजाब किंग्सने कमालची कामगिरी केली होती. त्यामुळे आता हा सामना जिंकून ते अपराजित राहण्याचे इराद्यात असतील पण त्यांना २०६ धावा विजयासाठी कराव्या लागणार आहेत.
पंजाब किंग्सचा गोलंदाजांबद्दल बोलायचं झाले तर संघाच्या गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली नाही. अर्शदीप सिंह याने संघासाठी एक विकेट घेतला त्याचबरोबर मार्को जॉन्सन याने संघासाठी एक विकेट घेतला आणि लॉकी फर्ग्युसन याने संघासाठी दोन विकेटची कमाई केली. युजवेंद्र चहालच्या हाती एकही विकेट लागली नाही. त्याचबरोबर मार्कस स्टॉयनिस याला चार ओव्हरमध्ये ४८ धावा ठोकल्या. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल याने १ ओव्हर टाकली आणि ६ धावा दिल्या.