फोटो सौजन्य – X
न्युझीलंड विरुद्ध झिम्बाम्वे दुसरा कसोटी सामना : न्युझीलंड विरुद्ध झिम्बाम्वे यांच्यामध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे, या सामन्यामध्ये न्युझीलंडच्या संघाने विजय मिळवुन झिम्बाम्वेच्या संघाविरुद्ध मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आजपासुन या मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये न्युझीलंडच्या संघाचे कर्णधारपद हे टॉम लॅथम यांच्याकडे होते. त्याने पहिल्या सामन्यामध्ये संघाची कमाना चांगली सांभाळली होती. आता न्युझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
मालिकेतील पहिला सामना जिंकून किवी संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही, त्यानंतर मिशेल सँटनर कर्णधारपद भूषवताना दिसला. आता टॉम लॅथम दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर असल्याने किवी संघाचा ताण थोडा वाढला आहे. झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ७ ऑगस्ट रोजी बुलावायो येथे खेळला जाईल.
भारताच्या संघासाठी लकी चार्म! या खेळाडूचे पदार्पणापासून दमदार आकडे, वाचा सविस्तर
किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथम देखील या सामन्यातून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने एका प्रेस रिलीजद्वारे ही माहिती शेअर केली आहे. टॉम सध्या डाव्या खांद्याच्या दुखापतीशी झुंजत आहे, चाहत्यांना आशा होती की तो दुसऱ्या कसोटीपर्यंत तंदुरुस्त होईल आणि मैदानात परतेल, परंतु तसे झाले नाही. आता पुन्हा एकदा न्यूझीलंडला टॉम लॅथमशिवाय खेळावे लागेल.
न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे की, “डावीकडील खांद्याच्या दुखापतीतून अद्याप बरा न झाल्यामुळे टॉम लॅथम झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. जोहान्सबर्गमध्ये क्रिकेट खेळणारा ऑकलंड एसेसचा फलंदाज बेवन जेकब्स याला क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी कव्हर म्हणून बोलावण्यात आले आहे.”
Squad News | Tom Latham has been ruled out of the second Test against Zimbabwe after failing to recover from his left shoulder injury.
Auckland Aces batter Bevon Jacobs, who has been playing cricket in Johannesburg, has been called in as fielding and batting cover. Full story ⬇️…
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 6, 2025
गेल्या वर्षी, टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली, न्यूझीलंडने टीम इंडियाला त्यांच्या घरच्या मैदानावर ३-० ने हरवून इतिहास रचला. अशा परिस्थितीत, टॉम लॅथमच्या अनुपस्थितीमुळे किवी संघाचा प्लेइंग इलेव्हन थोडा असंतुलित झाला आहे. टॉम लॅथमच्या अनुपस्थितीमध्ये आता मिचेल सॅंटनर हा संघाचे नेतृत्व करणार आहे.