Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल
ब्लॅक फ्रायडे हा अमेरिकेतील असा दिवस आहे जेव्हा प्रत्येक वर्षी टेक प्रोडक्ट्स आणि गॅजेट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जातं. हीच पद्धत आता भारतात देखील हळूहळू सुरु केली जात आहे. 2025 मध्ये हा ट्रेंड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. Amazon आणि Flipkart सह लोकल ई-कॉमर्स आणि गेमिंग स्टोर्स देखील ब्लॅक फ्रायडे सेलचा भाग बनत आहेत. भारतात ब्लॅक फ्रायडे सेल कधी सुरु होणार आहे आणि कोणत्या प्रोडक्ट्सवर तगडे ऑफर्स उपलब्ध असणार आहेत, जाणून घेऊया.
अमेरिकेत दरवर्षी Thanksgiving च्या पुढील दिवशी Black Friday सेल आयोजित केला जातो. यावर्षी हा दिवस 28 नोव्हेंबर 2025 रोजी येणार आहे. मात्र भारतात हा सेल केवळ एकाच दिवसाचा नसतो, तर भारतात हा सेल 28 नोव्हेंबर रोजी सुरु होणार असून 2 डिसेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 5 दिवस ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या ऑफर्स आणि कॅशबॅकचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतातील क्रोमा, विजय सेल्स, रिलायन्स डिजिटल आणि जिओमार्ट सारखे प्लॅटफॉर्म्स देखील ब्लॅक फ्रायडे सेलचा भाग बनत आहेत. यावर्षी कंपन्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये अनेक एक्सक्लूसिव ऑफर्स घेऊन येण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये ग्राहकांना मोबाइल, लॅपटॉप आणि गेमिंग सेगमेंट कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
2025 च्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जातं. Nothing Phone (3) आणि Phone (2a+) सारख्या मॉडेल्सवर 20% पर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. OnePlus 15 आणि OnePlus Nord 5 SE वर बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनससह आकर्षक डील्स उपलब्ध असण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy Z Fold 7 आणि Galaxy S24 Ultra सारख्या फ्लॅगशिप फोन्सवर देखील मोठं डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये आयफोन्सच्या खरेदीवर काही स्पेशल ऑफर्स दिल्या जाण्याची देखील शक्यता आहे, ज्यामध्ये बँक कॅशबॅकसह Apple Accessories वर डिस्काऊंट दिलं जाणार आहे.
ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये प्लेस्टेशन स्टोअर, स्टीम, एपिक गेम्स स्टोअर आणि एक्सबॉक्स स्टोअर सारख्या प्लॅटफॉर्नवर सुमारे 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जाण्याची शक्यता आहे. PS5 आणि Xbox Series X/S कन्सोलवरही मर्यादित कालावधीच्या ऑफर असण्याची शक्यता आहे.Nintendo Switch OLED वर देखील बंडल ऑफर्स आणि गेम कलेक्शन डिस्काउंट्स दिलं जाऊ शकतं. भारतातील पीसी गेमर्सना या सेलमध्ये सायबरपंक 2077, रेड डेड रिडेम्पशन 2, रेसिडेंट एव्हिल 4 रिमेक आणि बाल्डूर गेट 3 सारखे काही सर्वोत्तम गेम अर्ध्या किमतीत खरेदी करता येतील.
ब्लॅक फायडे सेल म्हणजे काय?
ब्लॅक फायडे सेल ही दरवर्षी येणारी ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंग सेल आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम अप्लायन्सेस आणि अन्य वस्तूंवर मोठे डिस्काउंट्स मिळतात.
ब्लॅक फायडे सेल 2025 कधी सुरु होणार आहे?
ब्लॅक फायडे 2025 नोव्हेंबरच्या चौथ्या शुक्रवारी सुरु होईल. ही तारीख प्रत्येक वर्षी बदलते.
ब्लॅक फायडे सेलमध्ये कोणत्या कंपन्या भाग घेतात?
Amazon, Flipkart, Croma, Reliance Digital, Tata Cliq, AJIO, Myntra, आणि अनेक इतर ई-कॉमर्स आणि रिटेल ब्रँड्स या सेलमध्ये भाग घेतात.






