'AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत', गुगल क्लाउडच्या CEO चा मोठा दावा (Photo Credit- X)
थॉमस कुरियन यांच्या मते, AI हे माणसांच्या नोकऱ्या पूर्णपणे संपवण्यासाठी नाही, तर त्यांना अधिक चांगले काम करण्यासाठी मदत करण्यासाठी तयार केले गेले आहे. कुरियन म्हणाले की, “AI कर्मचाऱ्यांची जागा घेत नाही, उलट वाढत्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो त्यांना मदत करत आहे.” त्यांच्या मते, AI ची सध्याची खरी भूमिका म्हणजे मानवाच्या क्षमता आणि त्यांच्या संभाव्यतेमधील अंतर (Gap) भरून काढणे आहे, त्यांना पूर्णपणे बदलणे नाही.
थॉमस कुरियन यांनी ‘गुगल कस्टमर एन्गेजमेंट सूट’ (Google Customer Engagement Suite) या AI-आधारित प्लॅटफॉर्मचे उदाहरण दिले. हे व्यासपीठ कस्टमर सर्विस टीम्सना मदत करते. कुरियन यांच्या म्हणण्यानुसार, हे प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या कोणत्याही क्लायंटने कर्मचाऱ्यांची कपात केलेली नाही. उलट, AI मुळे ग्राहकांना जलद आणि अचूक उत्तरे मिळत असल्यामुळे त्यांना वारंवार कॉल करण्याची गरज पडत नाही. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही हे प्रथम सुरू केले, तेव्हा लोकांनी विचारले—आता एजंट्सची गरज राहणार नाही का? पण तसे झाले नाही. आमच्या जवळपास कोणत्याही क्लायंटने कर्मचाऱ्याला काढलेले नाही.”
ओरॅकलमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर गुगलमध्ये आलेले कुरियन, AI बद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या टेक लीडर्सपैकी एक आहेत. नुकतेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनीही AI मुळे गुगलच्या इंजिनिअर्सची उत्पादकता सुमारे १०% वाढल्याचे सांगितले होते.
कुरियन आणि पिचाई दोघांचेही मत आहे की, AI हा ‘ऍक्सिलेरेटर’ (Acceleretor) आहे, ‘ऑटोमेटर’ (Automator) नाही. म्हणजेच, AI माणसांची जागा घेत नाही, तर त्यांच्या कामाची गती आणि कार्यक्षमता वाढवतो. थॉमस कुरियन यांच्या शब्दांत, “या वेगाने बदलणाऱ्या जगात लोकांना ‘तालमेल राखण्यास’ (Keep Up) मदत करणे हा AI चा खरा उद्देश आहे, त्यांना यातून बाहेर ढकलणे नाही.”
App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!






