फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर
जेव्हा यूजर त्यांच्या मित्राचा एयरटेल प्रीपेड नंबर एंटर करतात, प्रीपेड रिचार्ज निवडतात आणि व्यवहार पूर्ण करतात, त्यानंतर हा अनुभव सुरु होणार आहे. यानंतर यूजर्स वेगवेगळ्या मैत्रीसाठी डिझाईन केलेले विविध प्रकारचे डिजिटल फ्रेंडशिप बँड निवडू शकणार आहेत. यामध्ये “जिम बडी,” “मीम डीलर,” “गेडी पार्टनर,” “फूडी फ्रेंड,” “गॉसिप स्पिलर” आणि “फ्री थेरेपिस्ट” यांचा समावेश आहे.
तुम्ही एखाद्या डिजीटल फ्रेंडशिप बँडची निवड केल्यानंतर, हा फ्रेंडशिप बँड फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छांसह व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे शेअर केले जाऊ शकते. यामुळे मेसेज जास्त पर्सनल दिसू लागतो. यानंतर, समोरील यूजरला असा पर्याय दिला जातो की, ते कँपेन पेजद्वारे एखाद्या दुसऱ्या यूजरला फ्रेंडशिप बँड देऊन ही चैन पुढे सुरु ठेऊ शकतात.
या उपक्रमाद्वारे, एअरटेल आजच्या डिजिटल जगासाठी मैत्रीच्या बँड्सची (फ्रेंडशिप बँड्स) पारंपरिक देवाणघेवाण एका नव्या रूपात सादर करत आहे. प्रीपेड रिचार्जसह शुभेच्छांचा एक छान संदेश जोडून, कंपनी ग्राहकांना मैत्री साजरी करण्याचा एक साधा पण खास मार्ग उपलब्ध करून देत आहे. हे कँपेन सामान्य रिचार्जला अशा एका अनुभवात बदलते जो इतरांसोबत शेअर केला जाऊ शकतो; यामुळे मित्रांशी जोडले जाणे आणि विविध प्रसंग अविस्मरणीय पद्धतीने साजरे करणे सोपे होते. तुम्ही देखील यंदाचा फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी एअरटेलच्या या खास ऑफरचा फायदा घेऊ शकता.






