IPL सीजनमध्ये Airtel ची ग्राहकांसाठी खास ऑफर! Wi-Fi कनेक्शनवर करू शकता तब्बल इतक्या रुपयांची बचत, जाणून घ्या सर्वकाही
तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफीसमध्ये सुपरफास्ट वायफाय कनेक्शनची गरज असेल तर Airtel तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. Airtel मध्ये तुम्हाला केवळ चांगल्या नेटवर्कची सुविधाच मिळत नाही तर अनेक ऑफर्स देखील दिले जातात ज्यामुळे तुमची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. Airtel त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनसोबतच वायफाय कनेक्शनवर देखील अनेक डिल्स देते. ज्यामुळे ग्राहकांची बचत होते आणि उत्तम नेटवर्कचा अनुभव घेता येतो.
आता देखील कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर मोबाईल नेटवर्कसाठी नाही तर वायफाय कनेक्शनसाठी सुरु करण्यात आली आहे. IPL 2025 साठी ही ऑफर सुरु करण्यात आली आहे. Airtel ने त्यांच्या ग्राहकांसाठी खास ब्रॉडबँड ऑफर लाँच केली आहे. यामध्ये नवीन कनेक्शनवर ग्राहकांना मोठी बचत करण्याची संधी दिली जात आहे. म्हणजेच उत्तम नेटवर्कसोबतच पैशांची देखील बचत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने त्यांच्या ग्राहकांना IPL 2025 च्या मॅचचा आनंद घेता यावा यासाठी हि विशेष ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये नवीन कनेक्शन खरेदी केल्यास ग्राहकांना 700 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. म्हणजेच नवीन कनेक्शन खरेदी केल्यास ग्राहकांची 700 रुपयांची बचत होणार आहे.
Airtel ने IPL 2025 सिझनरम्यान Xstream Fiber ब्रॉडबँडसाठी ही खास प्रमोशनल ऑफर सुरु केली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच Airtel चे ब्रॉडबँड कनेक्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला Airtel चे ब्रॉडबँड कनेक्शन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे, जिथे तुम्हाला 700 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. पण लक्षात ठेवा ही ऑफर काही निवडक शहरांसाठी सुरु करण्यात आली आहे.
सर्वात आधी Airtel च्या ऑफिशियल वेबसाइट किंवा Airtel Thanks App वर जा. इथे नवीन Xstream Fiber कनेक्शन बुक करा. जर तुम्हाला या ऑफरमध्ये तुमच्या शहराचं नाव दिसत असेल तर तुम्हाला डिस्काउंट दिलं जाणार आहे.
Airtel चे हे ब्रॉडबँड 100 Mbps पासून 1 Gbps पर्यंत सुपरफास्ट स्पीड ऑफर करते. जे स्ट्रीमिंग, गेमिंग आणि वर्क फ्रॉम होमसाठी फायद्याची ठरते. यामध्ये ग्राहकांना फ्री Wi-Fi राउटर आणि फ्री इंस्टॉलेशन दिले जाते. Xstream Fiber च्या काही खास प्लॅन्समध्ये Amazon Prime Video, Netflix आणि Disney+ Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते.
ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे, जी केवळ IPL 2025 सीजनपर्यंत सुरु राहणार आहे.