आजपासून बंद होतंय Microsoft चं हे पॉप्युलर व्हिडीओ - कॉलिंग प्लॅटफॉर्म, वाचा बेस्ट अल्टरनेटिव्हची यादी
टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट त्यांचं लोकप्रिय व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म Skype OG आता बंद करणार आहे. आज या प्लॅटफॉर्मचा शेवटचा दिवस असून आजपासून हे प्लॅटफॉर्म बंद केलं जाणार आहे. मायक्रोसॉफ्टने याबाबत आधीच घोषणा केली होती आणि सांगितलं होतं की, 5 मेपासून Skype OG बंद केलं जाणार आहे. ऑफीस मिटिंगवेळी व्हिडीओ कॉल करण्यासाठी Skype OG अत्यंत फायदाचं ठरत होतं. मात्र आता हे प्लॅटफॉर्म बंद केलं जाणार आहे.
Flipkart Vs Amazon: कुठे मिळतेय iPhone 16 आणि 16 Pro वर स्वस्त Deal? जाणून घ्या सविस्तर
28 फेब्रुवारी 2025 रोजी मायक्रोसॉफ्टने घोषणा केली होती की, ते हा लोकप्रिय व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या तयारीत आहेत. हा प्लॅटफॉर्म मेमध्ये बंद केला जाणार अशी घोषणा आधीच करण्यात आली होती. एक काळ असा होता जेव्हा Skype OG डिजिटल कम्युनिकेशनमधील सर्वात मोठं नाव होतं. कंपनीने केवळ Skype OG चं नाही त्यासंबंधित अनेक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, Skype OG बंद करण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीने नवीन यूजर्ससाठी Skype क्रेडिट आणि कॉलिंग प्लॅनसह सशुल्क Skype सर्विसची विक्री देखील बंद केली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, जुने युजर्स त्यांची सदस्यता संपेपर्यंत या सेवेचा वापर करू शकणार आहे. अगदी प्लॅटफॉर्म बंद झाला तरी सशुल्क युजर्ससाठी तो सुरु राहणार आहे. म्हणजेच प्लॅटफॉर्म बंद झाला तरी सशुल्क युजर्सचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
Mark Zuckerberg पासून ते Elon Musk पर्यंत, कसं आहे जगातील टॉप टेक लीडर्सचं मॉर्निंग रुटीन
युजर्स त्यांची सदस्यता संपेपर्यंत या सेवेचा वापर करण्यासाठी सक्षम असणार आहेत. पेड यूजर्स त्यांची मेंबरशिप संपेपर्यंत Skype डायल पॅड अॅक्सेस करू शकतात. यासाठी युजर्सना Skype वेब पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. किंव युजर्स थेट Microsoft Teams च्या मदतीने देखील Skype डायल पॅड अॅक्सेस करू शकणार आहेत.
मायक्रोसॉफ्टने यूजर्सना फेब्रुवारी ते मे 2025 असा दोन महिन्यांचा कालावधी Teams वर स्विच करण्यासाठी दिला होता. Skype वरून Teams वर स्विच अगदी सोपं आहे. तुम्हाला Skype क्रेडेंशियलसह लॉग इन करावं लागणार आहे. लॉगिन केल्यानंतर कॉन्टॅक्ट, चॅट आणि कॉल हिस्ट्री देखील ऑटोमेटिक ट्रांसफर होणार आहे. Microsoft चं मत आहे की, Teams मध्ये Skype मधील सर्व फीचर्स देण्यात आले आहेत.
Google Meet: गूगल मीट Skype चा बेस्ट अल्टरनेटिव ठरू शकतो, जो तुम्ही गुगल अकाऊंटच्या मदतीने वापरू शकता. बहुतेक Skype युजर्सकडे त्यांचं गुगल अकाऊंट आहे. त्यांना केवळ Skype वरून Google Meet वर स्विच करायचं आहे. गुगल मीटवर तुम्हाला व्हिडिओ कॉल, स्क्रीन शेअरिंग आणि मीटिंग रेकॉर्डिंग सारखे अनेक फीचर्स मिळतात. तथापि, मोफत वापरकर्त्यांसाठी काही मर्यादा आहेत.
Zoom: गुगल मीट प्रमाणे, झूम हा स्काईपचा सर्वोत्तम पर्याय आहे जिथे तुम्ही 100 सहभागी जोडू शकता आणि ते सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही चॅट पर्याय देखील देते .यामध्ये तुम्हाला स्क्रीन शेअरिंग, व्हर्च्युअल व्हाईटबोर्ड सारखी साधने देखील मिळतात. मीटिंग रेकॉर्ड करण्याचा आणि मजकूर ट्रान्सक्रिप्ट नंतर पाहण्याचा पर्याय देखील आहे.