Airtel यूजर्सच्या अडचणी वाढल्या! कंपनीने हे रिचार्ज प्लॅन केले आहेत महाग, जाणून घ्या नवीन किमती
तुम्हीही एअरटेल युजर असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. माहितूनुसार आता एअरटेल युजर्सच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत. वास्तविक, एअरटेलने अलीकडेच व्हॉईस आणि एसएमएस-केवळ प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. ज्यांना डेटाची गरज नाही अशा लोकांना लक्षात घेऊन ही योजना आणण्यात आली आहे. यासोबतच एअरटेलनेही आपल्या काही यूजर्सना मोठा झटका देखील दिला आहे.
वास्तविक, कंपनीने गुपचूप दोन प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. हे दोन प्लॅन्स सक्रिय करण्यासाठी आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. यातील पहिला प्लॅन 509 रुपयांचा आहे, जो महाग झाला आहे. तर दुसरा प्लान 1999 रुपयांचा आहे, ज्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील. या प्लॅन्सच्या नवीन किमती आणि यात मिळत असलेल्या बेनेफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Galaxy Unpacked 2025: सॅमसंग आणत आहे मल्टी-फोल्डेबल स्मार्टफोन, कंपनीने केले कन्फर्म
महाग झालेत रिचार्ज प्लॅन्स
एअरटेलच्या 509 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत आता 548 रुपये झाली आहे. म्हणजेच कंपनीने त्यात 39 रुपयांची वाढ केली आहे. त्याच वेळी, एअरटेलचा 1999 रुपयांचा प्लॅन आता 2249 रुपयांमध्ये सक्रिय केला जाऊ शकतो. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, आम्हाला पूर्वीसारखेच कमी-अधिक लाभ मिळत आहेत. मात्र, आता त्यात अधिक डेटा उपलब्ध होणार आहे.
548 रुपयांच्या प्लॅनचे बेनेफिट्स
या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 7GB डेटा आणला जातो. यात अनलिमिटेड लोकल STD आणि रोमिंग कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 900 एसएमएस आणि 3 महिन्यांसाठी अपोलो सर्कलमध्ये (Apollo Circle) प्रवेश मिळतो. यासोबतच युजर्ससाठी यात एअरटेल फ्री हॅलो ट्यून देखील उपलब्ध आहे.
चालता चलता अचानक Internet बंद झाला? मग लगेच हे काम करा, क्षणार्धात नेट होईल सुपरफास्ट
2249 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय खास आहे?
2249 रुपयांचा प्लॅन, जो आधी 1999 रुपयांमध्ये उपलब्ध होता. या प्लॅनमध्ये युजर्सना 30GB डेटा, 3600 SMS आणि अनलिमिटेड लोकल STD आणि रोमिंग कॉलिंग सारखे फायदे मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस आहे. यातही वरील योजनांप्रमाणेच फायदे आहेत.
ईअरली प्लॅन
हे दोन्ही प्रीपेड प्लॅन एअरटेल थँक्स ॲप आणि एअरटेल वेबसाइटवर उपलब्ध आहेत. एअरटेल आता 3,599 रुपयांचा डेटा बेनेफिट्ससह वार्षिक प्लॅन ऑफर करत आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 100 एसएमएस मिळतील. यासोबतच यात इतरही अनेक फायदे दिले जातात.