Amazfit Bip 6 अखेर भारताच लाँच! GPS सपोर्ट, AMOLED डिस्प्ले आणि मिळणार हे खास फीचर्स; इतकी आहे किंमत
टेक कंपनी Amazfit ने भारतात Bip 6 स्मार्टवॉच लाँच केली आहे. लाँच करण्यात आलेलं नवीन गॅझेट Bip स्मार्टवॉच सीरीजचे लेटेस्ट मेंबर आहे. या स्मार्टवॉचची किंमत 8 हजार रुपयांच्या घरात आहे. Amazfit च्या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये 1.97 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आहे.
Amazfit कंपनीचे अनेक स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहेत. मात्र या स्मार्टवॉचमध्ये LCD डिस्प्ले देण्यात आला होता. मात्र आता कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टवॉच AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. या नवीन वॉचमध्ये कंपनीने ऑटोमेटिक ब्राइटनेस एडजस्टमेंटसाठी एम्बिएंट लाइट सेंसर दिला आहे. (फोटो सौजन्य – X)
Amazfit Bip 6 स्मार्टवॉच कंपनीने ब्लॅक, चारकोल, स्टोन आणि रेड या रंगांमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टवॉचची किंमत 7999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टवॉच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India आणइ Amazfit India च्या ऑफिशियल वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.
Amazfit Bip 6 च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, या नवीनतम स्मार्टवॉचमध्ये कंपनीने अॅल्यूमिनियम अलॉय फ्रेमसह डिझाईन केलं आहे. यासोबतच या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील देण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये स्पीकर आणि मायक्रोफोन देखील देण्यात आले आहेत.
Amazfit Bip 6 स्मार्टवॉच 5 ATM (50 मीटर) पर्यंत वाटरप्रूफ आहे. यासोबतच Amazfit Bip 5 सोबत तुलना करत Amazfit Bip 6 मधील आयपी रेटिंग अधिक सुधारण्यात आलं आहे. Amazfit ची लेटेस्ट वॉच IP68 रेटिंगसह लाँच करण्यात आली आहे. यासोबतच नेविगेशन सपोर्टसाठी यामध्ये 5 सॅटेलाइट सिस्टम सपोर्ट वाला GPS देखील देण्यात आला आहे.
Amazfit Bip 6 स्मार्टवॉचमध्ये 140 पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये HYROX Race, Smart Strength Training, आणि Personalized AI Coaching यांचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने असा दावा केला आहे की, हे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 14 दिवसांपर्यंत चालतं.
BioTracker 6.0 PPG सेंसरसह येणाऱ्या Amazfit BIP 6 मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सीजन (SpO2) मेजरमेंट, HRV ट्रॅकिंग आणि स्ट्रेस इवॅल्युएशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये अॅडवांस्ड स्लीप ट्रॅकिंग फीचर्स देखील दिले जातात आणि स्लीप स्टेजेज व ब्रीथिंग क्वॉलिटीबाबत माहिती देखील दिली जाते. याशिवाय स्मार्ट स्ट्रेन्थ ट्रेनिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच, या स्मार्टवॉचमध्ये आउटडोर वर्कआउटसाठी ऑफलाइन नेविगेशन आणि राउंड-ट्रिप रूटिंग सारखे फीचर्स दिले जातात.