डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem
फ्री फायर मॅक्समधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे रिडीम कोड्स. रिडीम कोड्समुळे प्लेअर्सना नवीन आणि आकर्षक रिवॉर्ड्स मिळतात.यामुळेच फ्री फायर मॅक्सच्या रिडीम कोडला प्रचंड डिमांड आहे. या गेममध्ये तुम्हाला कोणतीही खरेदी करायची असेल तर इन-गेम करेंसी डायमंड खर्च करावे लागतात. पण रेडिम कोड्समुळे प्लेअर्सना अनेक वस्तू फ्रीमध्ये मिळतात. यामुळे फ्री फायर मॅक्स गेमर्स या कोड्सची प्रचंड वाट पाहत असतात.
गेम तयार कंपनी गरेनाचा असा दावा आहे की, गेमिंग कोड्समुळे गेम अधिक मजेदार होता आणि प्लेअर्सना डायमंड खर्च केल्याशिवाय धमाकेदार आइटम जिंकण्याची संधी मिळते. Free Fire Max चे रिडीम कोड रोज रिलीज होतात. या रिडीम कोडची संख्या 12 ते 16 अंकांपर्यंत असते. या कोड्समध्ये नंबर आणि अक्षरांंचं मिश्रण असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रिडीम कोड मर्यादित काळासाठी उपलब्ध असून पहिले 500 गेमर्सचं हे कोड रिडीम करू शकतात. हे कोड्स केवळ एकदाच रिडीम केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा पावरफुल, पण फोटो मात्र बेकार; या 5 सेटिंग्ज करणार तुमची मदत
गेम डेव्हलपर कंपनीने जून महिन्यासाठीचे फ्री फायर मॅक्स इव्हो अॅक्सेस सबस्क्रिप्शन पास जारी केले आहे. या इव्हो अॅक्सेसमुळे प्लेअर्सना एकाच वेळी गेममधील अनेक आयटमचा अॅक्सेस मिळणार आहे. हा पास 2 जुलै 2025 पर्यंत व्हॅलिड असणार आहे. या पासमुळे तुम्हाला जून महिन्यात दोन इव्हो गन स्किन्स MP40- प्रीडेटरी कोब्रा आणि G18- अल्टिमेट अचीव्हर मिळतील. याशिवाय, यात मोफत पेट पॅक, मोफत कॅरेक्टर पॅक, स्पेशल चॅट बबल, 100 हून अधिक मित्रांसाठी स्लॉट आणि अतिरिक्त आउटफिट स्लॉट समाविष्ट आहेत.






