Amazon Prime Day 2026: स्मार्टफोन्स झाले स्वस्त! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतय बंपर डिस्काऊंट... संधी चुकली तर पश्चाताप कराल
Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच क्यूएचडी+ अमोलेड डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा यासाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 5x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस दिला आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 1,29,999 रुपयांत लाँच केला होता. पण आता सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत 84,999 रुपये झाली आहे.
आयक्यू 15 मध्ये 6.85 इंच डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्सची पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसरवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. आयक्यू 15 मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, लॉसलेस झूमसह 3x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि एक अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस समाविष्ट आहे.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे 12GB + 256GB व्हेरिअंट 76,999 रुपयांऐवजी आता 75,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच या डिव्हाईसच्या खरेदीवर 4000 रुपयांचे डिस्काऊंट कूपन देखील दिले दाते आहे. या सर्व डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत थेट 71,999 रुपये होणार आहे.
शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्राने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये Leica ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या डिव्हाईसमध्ये ओआयएस सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूमवाला 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस समाविष्ट आहे.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ॲमेझॉनवर आता हा स्मार्टफोन 59,998 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईसची लाँच किंमत 84,999 रुपये आहे. ही किंमत डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटसाठी आहे. तसेच कार्डने पेमेंट केल्यास 2,250 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.
वनप्लस 13 मध्ये 6.82 इंच डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 4,500 निट्सची पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्टसह येतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटने सुसज्ज आहे. याशिवाय, या डिव्हाईसमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली आहे. वनप्लस स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल-कॅमेरा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमवाला 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा सेंसर आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेंसर समाविष्ट आहे.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. सेलमध्ये वनप्लस 13 च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपयांऐवजी 54,999 रुपये झाली आहे.






