Google Maps मध्ये दिसणाऱ्या सात रंगांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
आपल्याला कुठेही जायचं असेल तर सर्वात आधी आपण ते लोकेशन गुगल मॅपवर चेक करतो. रस्ता कोणता आहे, संबंधित ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, ट्रॅफिक आहे का, ही सर्व माहिती गुगल मॅप आपल्याला देते. गुगल मॅप एक लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप आहे. गुगल मॅपचे शेकडो युजर्स आहेत. गुगल मॅप त्यांच्या युजर्सना अनेक वेगवेगळे फीचर्स ऑफर करत असते.
गुगल मॅपमध्ये लाइव व्यू, द पिन मॅन, 360 डिग्री व्हिडिओ, वॉयस गाइडंस, कन्वर्सेशनल सर्च, एआय अपडेट्स आणि नो-कोड टूल्स, एक्सेसिबिलिटी जानकारी, 3डी इमर्सिव व्यू, लेन्स इन मॅप्स, डू नॉट ड्राइव, एआय पावर्ड सर्च विथ फोटोज, फ्लाइट प्राइस असेअ इतर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. कुठेही प्रवास करायचा असेल तर हे फीचर्स युजर्सना मदत करतात आणि त्यांचा प्रवास अधिक सोपा करतात. तुम्ही देखील तुमच्या प्रवासात गुगल मॅपचा वापर केला असेलच. गुगल मॅपमध्ये सात रंगांचा वापर केला जातो. या 7 रंगांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? (फोटो सौजन्य – Pinterest)
निळा रंग – जर तुम्ही गुगल मॅप्सवर नेव्हिगेशनचा वापर करत असाल आणि तुम्हाला मॅपवर रस्ता निळा दिसत असेल, तर समजून घ्या की मार्ग पूर्णपणे मोकळा आहे आणि तुम्हाला कोणत्याही ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही. म्हणजेच तुमचा प्रवास अगदी जलद आणि आनंदी होणार आहे.
हिरवा रंग – जर तुम्ही केवळ मॅप बघत असाल आणि नेव्हिगेशनचा वापर करत नसाल तर हिरवा रंग तुम्हाला पाहायला मिळेल. हिरवा रंग संकेत देतो की रस्त्यात प्रवासावेळी कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही.
पिवळा किंवा नारंगी रंग – जर गुगल मॅपचा वापर करताना तुम्हाला एखाद्या मार्गावर पिवळा किंवा केशरी रंग दिसला तर याचा अर्थ असा की मार्गावर कमी ट्रॅफिकचा सामना करावा लागणार आहे, परंतु त्यामुळे तुमच्या प्रवासात थोडासा विलंब होऊ शकतो
लाल रंग – तुम्हाला गुगल मॅपचा वापर करताना दोन प्रकारचे लाल रंग दिसतील, सामान्य लाल आणि गडद लाल. जर सामान्य लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ ट्रॅफिक कमी प्रमाणात आहे. मात्र गडद लाल रंग दिसत असेल तर जास्त ट्रॅफिक मिळेल.
Tech Tips: Password शिवाय कनेक्ट करू शकता Wi-Fi, फक्त फॉलो कराव्या लागणार या स्टेप्स
तपकिरी रंग – हा रंग पर्वत किंवा उंच भाग दर्शवण्यासाठी वापरला जातो. जर तुम्हाला गुगल मॅपचा वापर करताना कोणत्याही ठिकाणी तपकिरी रंग दिसला तर समजून घ्या की तो भाग डोंगराळ किंवा उंच आहे. ही माहिती हायकिंग किंवा ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरते.
पर्पल रंग – जेव्हा तुम्ही मार्ग निवडता तेव्हा गूगल मॅप्स कधीकधी जांभळ्या रंगात पर्यायी मार्ग दाखवते. हा मार्ग अनेकदा थोडा लांब असू शकतो किंवा रहदारीमुळे प्रभावित होऊ शकतो.