चीनची मक्तेदारी उतरणार! रेअर अर्थ मिनरलसाठी 'हा' देश ठरणार जगाचा आधार, समीकरण बदलणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चीनची खैर नाही! भारताच्या ताफ्यात सामील होणार ‘हे’ अत्याधुनिक विमान, हिंद महासागरात गेम बदलणार?
मिळालेल्या माहितीनुसार, मलेशियाकडे अंदाजे १६.१ ते १६.२ दशलक्ष मेट्रिक टन रेअर अर्थ खनिजांचा साठ असल्याचे समोर आले आहे. विशेष करुन मलेशिया(Malaysia) च्या गेबेंग भागात या खनिजांवर प्रक्रिया करण्यासाठी जगताली सर्वात मोठा प्लांट उभारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन खाण कंपनी लायनसने या ठिकाणी उत्खननाचे आणि शुद्धीकरणाचे काम सुरु केले आहे. जागतिक बाजारपेठेतील किमा १०% वाटा ताब्यात मिळण्याचा याचा उद्दिष्ट आहे.
चीनने आतापर्यंत जपान(Japan) सारख्या देशांना पुरवठा रोखून ठेवला होता. शिवाय अमेरिकेलाही F-35 फायटर जेट आणि क्षेपणाश्त्र निर्मितीसाठी लागण्याऱ्या चिप्ससाठी चीनवर अवलंबून राहावे लागत होते. यातून संकटातून बाहेर पडण्यासाठी जपानने चीनवरील अवलंबित्व १००% वरुन ५० %पर्यंत आणले आहे.
आता मात्र मलेशियातील प्लांटमुळे उरलेले अवलंबित्व देखील कमी होण्याची शक्यता आहे. मलेशियातील प्लांटमध्ये १७ रेअर अर्थ खनिजे सापडली असून याती ११ प्रकारच्या खनिजांवर प्रक्रिया केली जाणार आहे. लवकरच कॅन्सर थेरपी आणि लेझर तंत्रज्ञानासाठी उपयुक्त खनिजांचेही उत्पादन सुरु होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एआय, इलेक्ट्रिक वाहने, विंड टर्बाईनच्या वाढत्या मागणीमुळे खनिजांचे महत्त्व अधिक वाढले आहे. मेलेशियाच्या प्रकल्पामुळे केवळ आशियाच नाही तर पाश्चात्य देशांकडेही चीनला पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे रेअर अर्थ खनिजांच्या जोरावर जगावर राज्य गाजवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनला मोठा धक्का बसला आहे. मलेशियाच्या खाणींमुळे हे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक समीकरणातही मोठा बदल घडून येताना दिसत आहे.
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी
Ans: रेअर अर्थ ही १७ नैसर्गिक खनिजांचा समूह आहे. ही खनिजे स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, विंड टर्बाईन आणि प्रगत संरक्षण उपकरणे तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. यांच्याशिवाय आधुनिक तं६ज्ञान आणि हरित उर्जेची कल्पवा अशक्य आहे.
Ans: सध्या जगातील ९० टक्के रेअर अर्थ शुद्धीकरणे एकट्या चीनकडे आहे. चीन याचा माज दाखवून, जपानसारख्या देशांना खनिजांचा पुरवठा रोखण्याची धमकी देतो. यामुळे संबंधित देशाची संरक्षण आणि तंत्रज्ञान व्यवस्था धोक्यात येऊ शकते.
Ans: रेअर अर्थ खनिजांमध्ये पर्याय म्हणून भारताचा शेजारी देश पुढे आला आहे. मलेशियाकडे अंदाजे १६.२ दशलक्ष मेट्रिक टन रेअर अर्थ साठा असून याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांना खनिजांच्या खरेदीसाठी मलेशिया चीनला पर्याय म्हणून उभारला आहे.






