(फोटो सौजन्य: Pinterest)
आजच्या या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन हे आपले गरजेचे साधन बनले आहे. हा आता आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा एक भाग झाला आहे. आपली अनेक दैनंदिन कामे आता स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. कॉलिंगपासून ते व्हिडिओ कॉल, ऑनलाइन पेमेंट, मनोरंजन इत्यादी अनेक कामांसाठी आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करतो. जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणारे असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला अँड्रॉईड फोनवर उपलब्ध असलेल्या एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला दैनंदिन कामात खूप मदत करेल.
आता तुम्ही ही गोष्ट अनेकदा नोटीस केली असेल की जेव्हा आपण बाहेर कोणत्या सार्वजनिक ठिकाणी कॉलवर बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आजूबाजूचा आवाज आपल्या कॉलमध्ये व्यत्यय आणत असतो. बाहेरच्या या आवाजामुळे, कॉलिंग दरम्यान आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. या आवाजामुळे तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत नीट पोहोचत नाही. तर कधी समोरच्याचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहचत नाही. जर तुम्हीही आपल्या रोजच्या जीवनात या समस्येने त्रस्त असाल आणि यावर एक सोपा आणि सहज उपाय शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनमधील अशा एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे आवाजाची समस्या पूर्णपणे दूर होईल.
चॅटजीबीटीचे गुगलला आव्हान! आता ChatGPT Search वापरण्यासाठी युजर्सना लॉगिन करावे लागणार नाही
थर्ड पार्टी ॲप्सची मदत घेण्याची गरज नाही
आम्ही तुम्हाला सांगतो की, Android स्मार्टफोनमध्ये आवाज काढून टाकण्यासाठी एक मस्त फीचर आहे. हे फिचर ऍक्टिव्ह करून तुम्ही या समस्येपासून कायमचे मुक्त होऊ शकता. विशेष म्हणजे बॅग्राऊंड नॉईस कमी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची मदत घेण्याची गरज भासणार नाही. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये आधीपासून सेटिंगमध्ये एक फिचर उपलब्ध असते ज्याच्या मदतीने युजर्स या समस्येचे निराकरण करू शकतात. तर या फीचरचे नाव आहे Clear Call. हे फिचर तुमच्या आवाजाला बॅग्राऊंड नॉईसमधून येणाऱ्या इतर सर्व आवाजांपासून वेगळे करते. काही काळापूर्वी हे फीचर इयरफोन्स आणि बड्समध्ये दिले जात होते पण आता हे फीचर स्मार्टफोनवरही आले आहे. हे फिचर ऑन करून, तुम्ही गर्दीच्या ठिकाणांहूनही सहज कॉल करू शकता.
जगातील सर्वात छोटे फोन! अंगठ्याहून लहान आहे या Phones चा आकार
बॅग्राऊंड नॉईसला असे करू शकता रिमूव्ह