Free Fire Max: बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट! आकर्षक रिवॉर्डसह फ्री मिळणार Trouble Trickster Katana स्किन
फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या गेमर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये नवीन टॉप – अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंड टॉप अप केल्यानंतर ट्रबल ट्रिकस्टर कटाना स्किन, शूज, हॅट, शॉर्ट आणि फेस पेंट सारखे आकर्षक रिवॉर्ड्स मिळणार आहेत. यासोबतच विंग्स ऑफ विक्टरी बॅनर जिंकण्याची संधी देखील प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार आहे.
कंपनी ज्याप्रमाणे रोज त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड जारी करत असते. त्याचप्रमाणे दर महिन्याला प्लेअर्सना आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळावी, यासाठी टॉप-अप ईव्हेंट देखील आयोजित केला जातो. यामध्ये मिळणारे रिवॉर्ड्स दर महिन्याला ईव्हेंटनुसार बदलतात. कंपनीने सप्टेंबरमध्ये आयोजित केलेल्या टॉप – अप ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. फ्री फायर मॅक्समध्ये 18 सप्टेंबरपासून ट्रबल टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट 19 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटदरम्यान, डायमंड खरेदी करून प्लेअर्सना गेमिंग आयटम मिळण्याची संधी मिळणार आहे. यावेळी, ट्रबल ट्रिकस्टर कटाना स्किन आणि स्पार्कलिंग जेम्स फेसपेंट इव्हेंटमध्ये मिळू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर गेम भारतात कधी बॅन करण्यात आला?
14 फेब्रुवारी 2022
फ्री फायरवर बंदी घालण्याचं कारण काय?
सुरक्षेच्या कारणास्तव आणि चीनशी असलेल्या कथित संबंधांमुळे
फ्री फायर भारतात पुन्हा कधी सुरु झाला?
2025 मध्ये फ्री फायर इंडिया या नावाने हा गेम पुन्हा सुरु करण्यात आला.