प्रत्येक मतदाराच्या हातात असणार 'शस्त्र', मोबाईलद्वारे करू शकतात निवडणुकीतील गडबडीचा रिपोर्ट
दिल्ली निवडणूक 2025 चा बिगुल अखेर वाजला आहे. पुढील महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार पार पडणार आहे. त्याचवेळी निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना निवडणूक आयुक्तांनी दिल्लीतील जनतेला कोणतीही गडबडी आढळल्यास त्याची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी सांगितले की, यासाठी जनतेच्या हातात एक ‘शस्त्र’ असेल, ज्याद्वारे ते निवडणुकीतील गडबड त्वरित थांबवू शकतात. आता हे नक्की कोणते शस्त्र आहे आणि याचा वापर जनता कसा करू शकते याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
जनतेच्या हाथी असेल हे शस्त्र
प्रत्येक मतदाराच्या हातात असलेले हे ‘शस्त्र’ म्हणजेच आपला स्मार्टफोन. हे शस्त्र तुम्हाला निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड टाळण्यास मदत करेल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. आपली तक्रार करण्यासाठी जनता याचा वापर करू शकते. तक्रार आल्यानंतर तत्काळ कारवाई केली जाईल. एवढेच नाही तर निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीही या शस्त्रास्त्राद्वारे ऑनलाइन करता येणार आहेत.
Optimize Router Setting: त्वरित वाढेल इंटरनेट स्पीड, अशाप्रकारे करू शकता राउटर सेटिंग्ज ऑप्टिमाइझ
कसं करावं रिपोर्ट?
निवडणूक आयोगाने काही काळापूर्वी CVIGIL ॲप लाँच केले आहे, ज्याद्वारे मतदार निवडणूक प्रचारादरम्यान गडबडीची तक्रार करू शकतात. भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) हे ॲप Google Play Store आणि Apple App Store या दोन्हींवर उपलब्ध आहे. ते डाउनलोड करण्यासाठी, Android आणि iOS युजर्स प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरला भेट देऊ शकतात.
ॲप डाउनलोड केल्यानंतर, CIVIGIL ॲप मतदाराकडून काही माहिती घेईल, ज्यामध्ये नाव, पत्ता (राज्य आणि जिल्ह्याचे नाव) आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ॲपचे मुख्यपृष्ठ उघडेल. जिथे मतदारांना खाली स्क्रोल करावे लागेल असे केल्यावर अनेक पर्याय दिसतील. येथे तुम्ही आचारसंहिता उल्लंघनापासून ते मतदान केंद्रावरील मतदानादरम्यानच्या गडबडीपर्यंत कोणत्याही गोष्टीची तक्रार करू शकता.
व्हॉट्सॲप चॅट Notification तुमची शांतता भंग करत आहे? मग फक्त 2 मिनिटांत करा ही सेटिंग
ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर, तुमची तक्रार नोंदवा आणि नंतर पुरावा म्हणून ऑडिओ किंवा व्हिडिओ अपलोड करा. या ॲपवर आलेल्या तक्रारींवर 100 तासांत कारवाई केली जाईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाच्या या ॲपवर, ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झालेल्या क्षेत्रातील विद्यमान दंडाधिकाऱ्यांपर्यंत तक्रार पोहोचेल. यानंतर गुन्ह्यासाठी शिक्षा दिली जाईल.