भारत इराणमधून काय आयात करतो? जाणून घ्या जर येथे सरकार बदलले तर सर्वात जास्त नुकसान कोणाला होईल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India Iran trade relations current status 2026 : मध्य-पूर्वेतील शक्तिशाली देश इराण (Iran) सध्या मोठ्या अंतर्गत संघर्षातून जात आहे. वाढती महागाई, इंटरनेटवर लादलेली बंदी आणि सरकारविरोधी निदर्शनांमुळे अयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणमधील ‘स्वातंत्र्य’ चळवळीला पाठिंबा दिल्याने तिथे सत्तापालटाचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, इराणमधील ही अस्वस्थता भारतासाठी केवळ राजकीय नाही, तर मोठी आर्थिक चिंतेची बाब आहे. भारत आणि इराणचे व्यापार संबंध इतके खोलवर आहेत की, तिथल्या एका निर्णयाचा परिणाम थेट भारतीय घराघरांपर्यंत पोहोचू शकतो.
भारतासाठी इराण हा पारंपरिकपणे कच्च्या तेलाचा (Crude Oil) एक प्रमुख स्त्रोत राहिला आहे. जरी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आपण सध्या इराणकडून थेट तेल खरेदी कमी केली असली, तरी इराण अजूनही भारताला कमी किमतीत तेल देण्यास तयार आहे. याव्यतिरिक्त, पिस्ता, खजूर, बदाम आणि इतर सुकामेव्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर इराणवर अवलंबून आहे. रसायने, पेट्रोकेमिकल उत्पादने आणि काचेच्या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. सण-समारंभात लागणाऱ्या सुकामेव्याची किंमत थेट इराणमधील परिस्थितीवर अवलंबून असते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Attack: Venezuelaच्या सैनिकांनी केल्या रक्ताच्या उलट्या; कोणते होते ‘ते’ रहस्यमय शस्त्र ज्याने भेदली मादुरोंची सुरक्षायंत्रणा?
केवळ आयातच नाही, तर भारताची निर्यातही इराणवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारत आपला ‘प्रीमियम बासमती तांदूळ’ सर्वात जास्त इराणला विकतो. जानेवारी २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, इराणने आयातीवरील सबसिडी रद्द केल्यामुळे भारताचा सुमारे २००० कोटी रुपयांचा तांदूळ बंदरांवर अडकला आहे. जर तिथे सरकार बदलले आणि व्यापाराचे नियम बदलले, तर हरियाणा आणि पंजाबमधील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तांदळासोबतच चहा, साखर, औषधे आणि ऑटोमोबाईल पार्ट्सचीही मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.
India’s abundant rice harvest is adding to an already oversupplied global market, pushing prices lower as demand stays weak and major buyers tighten import rules. As record output of 124.5 million tonnes in 2025-26, Indian exporters may cut prices by $15-25/tonne to compete with… pic.twitter.com/Tg7TqSU90I — Kom.Dt (@BharatKomDt) January 10, 2026
credit : social media and Twitter
भारताने इराणमध्ये ‘चाबहार बंदर’ विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हे बंदर भारताला पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी जोडणारे एकमेव प्रवेशद्वार आहे. रशियानेही या बंदरात रस दाखवला आहे. जर इराणमध्ये अमेरिकेला अनुकूल सरकार आले, तर निर्बंध हटून भारताला फायदा होईल. मात्र, जर तिथे यादवी युद्ध किंवा दीर्घकाळ अस्थिरता राहिली, तर भारताचा हा ‘गेटवे टू युरोप’ प्रकल्प रखडू शकतो, ज्याचा परिणाम भारताच्या जागतिक व्यापार रणनीतीवर होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Secret: ग्रीनलँडच्या बर्फात 58 वर्षांपासून दडलेले अणु-स्फोटक सत्य; Trumpच्या हट्टामागचे गुपित जगासाठी धोकादायक हेच तथ्य
इराणमधील सत्तापालटाचा सर्वात मोठा फटका भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बसू शकतो. जागतिक बाजारात तेलाचे दर वधारल्यास भारतात पेट्रोल-डिझेल महाग होईल. तसेच, इराणमध्ये असलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांच्या आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येईल. भारत सरकारने आधीच आपल्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल ॲडव्हायजरी’ जारी केली असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
Ans: इराणने आयातीवरील अनुदान (Subsidy) अचानक रद्द केल्याने भारताचा सुमारे २००० कोटी रुपयांचा बासमती तांदूळ निर्यात न होता बंदरांवर अडकून पडला आहे.
Ans: चाबहार बंदर हे भारताला पाकिस्तानच्या मदतीशिवाय अफगाणिस्तान, रशिया आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी अत्यंत मोक्याचे आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे.
Ans: होय, जर इराणमधील अस्थिरतेमुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) होणारा पुरवठा खंडित झाला, तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १३ ते २८ डॉलरने वाढू शकतात.






