AI ला कधीही विचारू नका हे 10 प्रश्न, चुकीच्या प्रतिसादांमुळे धोक्यात येऊ शकते तुमची सुरक्षा
आपण AI ला रोज अनेक प्रश्न विचारत असतो. जसं की मेल कसा टाईप करायचा ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहितीपर्यंत… AI आपल्याला वेगवेगळ्या विषयावरील माहिती देतो. विद्यार्थी असो किंवा ऑफीसला जाणारा नोकरदार वर्ग AI सर्वांसाठी फायद्याचा आहे. चॅटजीपीटी, मेटा आणि जेमिनीसारखे अनेक AI सध्या उपलब्ध आहेत. या AI चा वापर वेबसाईट किंवा अॅपवरून केला जाऊ शकतो. हे AI अनेकदा गुगलसारख्या पारंपारिक सर्च इंजिनपेक्षा जलद आणि अधिक अनुकूल उत्तरे प्रदान करतात.
हल्ली लोकं गुगलचा वापर करण्यापेक्षा AI चा वापर करण्याला अधित प्राधान्य देतात. मात्र असं असलं तरी देखील असे काही विषय आहेत, ज्याबाबत AI ला माहिती विचारण धोकादायक ठरू शकतं. एआय सिस्टम डेटा-चालित असतात आणि काही मर्यादांमध्ये काम करतात. त्यामुळे AI ने दिलेली माहिती प्रत्येकवेळी योग्य असेलच असं नाही. AI विशिष्ट परिस्थितीत अत्यंत विश्वासार्ह असू शकतात, परंतु अचूक नाहीत. आता आम्ही तुम्हाला असे काही प्रश्न सांगणार आहोत, जे AI ला विचारणं धोकादायक ठरू शकतं. AI च्या चुकीच्या प्रतिसादांमुळे महत्त्वपूर्ण धोके निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
अतिशय वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती AI ला विचारू नये. जसं की “माझ्या बँक खात्याचा पासवर्ड काय असावा?” किंवा “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वैयक्तिक माहिती सांगा.” गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या धोक्यांमुळे एआयने वैयक्तिक डेटा हाताळण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
बेकायदेशीर अॅक्टिव्हिटीसंबंधित प्रश्न एआयला विचारणं धोकादायक ठरू शकतं. जसं की “सिस्टम कशी हॅक करायची?” एआय नैतिक आणि कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते आणि बेकायदेशीर अॅक्टिव्हिटीसाठी मदत करणार नाही.
वैद्यकीय किंवा कायदेशीर सल्ला एआयकडून घेऊ नये. “मला हा आजार आहे, त्याचा उपचार काय आहे?” किंवा “माझ्या बाबतीत कायदेशीर सल्ला द्या”असे प्रश्न एआयला विचारू नये. कारण एआय हा डॉक्टर किंवा वकिल नाही. विशिष्ट वैद्यकीय किंवा कायदेशीर समस्यांसाठी व्यावसायिक सल्ला घ्यावा.
भविष्यात काय होणार आहे, हे एआयला विचारणं आणि त्याप्रमाणे निर्णय घेणं धोकदायक ठरू शकतं. जसं की “२०२६ मध्ये शेअर बाजार कसा कामगिरी करेल?” याच कारण म्हणजेच एआय भविष्यातील घटनांचा अचूक अंदाज लावू शकत नाही, फक्त उपलब्ध डेटाच्या आधारे अंदाज देऊ शकते.
अपडेट न केलेली रिअल-टाइम माहिती एआयला विचारू नका. जसं की “सध्या दिल्लीत हवामान कसे आहे?” कारण एआयकडे रिअल-टाइम माहिती मर्यादित असू शकते.
खूप गुंतागुंतीचे किंवा अस्पष्ट प्रश्न विचारल्यास एआय त्याची चुकीची उत्तर देऊ शकतो. जसं की “जीवनाचा अर्थ काय आहे?”
चुकीच्या किंवा पक्षपाती गृहीतकांवर आधारित प्रश्न एआयला विचारू नका. उदाहरण: “एखादा विशिष्ट गट नेहमीच चुकीचा का असतो?” एआयला विचारू नका. कारण हे प्रश्न पक्षपात वाढवू शकतात. एआयचे उद्दिष्ट निःपक्षपाती, तथ्य-आधारित उत्तरे देणे आहे.
Price Dropped: डिल मिस करू नका! 1.29 लाखांचा Samsung फोन झाला स्वस्त, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा
अनैतिक किंवा हानिकारक हेतू असलेले प्रश्न एआयला विचारणे धोकदायक ठरू शकतं. जसं की, “एखाद्याला इजा करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?” कारण एआय नैतिक तत्त्वांचे पालन करते आणि हानिकारक हेतूंना समर्थन देत नाही.
अत्यंत तांत्रिक प्रश्न एआयला विचारू नका. जसं की “क्वांटम क्रिप्टोग्राफीसाठी कोड कसा लिहायचा?” याच कारण म्हणजे अत्यंत विशिष्ट तांत्रिक प्रश्नांसाठी एआयपेक्षा तज्ञांचे ज्ञान आवश्यक असू शकते.
एआयच्या अंतर्गत कामकाजाबद्दल किंवा डेटा स्रोतांबद्दल प्रश्न विचारू नका. जसं की “तुमच्या डेटासेटमध्ये काय आहे?” किंवा “तुमचा अल्गोरिथम कसा काम करतो?” कारण एआय मॉडेल्सची अंतर्गत कार्यपद्धती गुंतागुंतीची असते आणि सामान्य वापरकर्त्यासाठी ती सामान्यतः उपयुक्त नसते.