Tech Tips: तुम्हीही iPhone साठी वापरताय Android चा टाइप सी चार्जर? आताच थांबा, नाहीतर होईल भलमोठं नुकसान
टेक जायंट कंपनी Apple दरवर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची नवीन iPhone सीरिज लाँच करत असते. या सर्व iPhone ची किंमत अँड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत खूप जास्त असते. केवळ iPhone च नाही तर त्यांच्या चार्जरची किंमत देखील खूप जास्त आहे. त्यामूळे असे देखील काही लोक असतात जे महागडा आयफोन तर खरेदी करतात पण जेव्हा चार्जरची वेळ असते, हे लोक अँड्रॉइड फोनचा किंवा एखादा जुना टाईप सी चार्जर आयफोन चार्ज करण्यासाठी वापरतात. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का?
तुम्ही देखील तुमचा iPhone 15 किंवा iPhone 16 सीरीजमधील एखादे मॉडेल जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या टाइप-C केबलने चार्ज करताय? तर आताच थांबा? तुमची ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते, यामुळे लवकरच तुमचा iPhone खराब होऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple त्यांच्या iphone साठी जी टाइप सी केबल देते, त्यामध्ये एक खास चिप लावलेली असते, जी सुरक्षित चार्जिंग सुनिश्चीत करते. तर अँड्रॉइड चार्जरचा विचार केला तर अनेक अँड्रॉइड चार्जरमध्ये अशी कोणतीही चिप दिलेली नसते. त्यामुळे असे चार्जर वापरल्यास तुमचा iPhone लवकर खराब होऊ शकतो. चुकीच्या चार्जरचा वापर केल्यास तुमच्या iPhone ची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. तसेच यामुळे iPhone ची चार्जिंग स्लो होऊ शकते किंवा मदरबोर्ड देखील जळू शकतो. यामुळे iPhone चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
Apple च्या Type-C केबलमध्ये एक इंटीग्रेटेड चिप दिलेली असते, जी iPhone ची चार्जिंग सिस्टिम सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करते. ही चिप ओवरचार्जिंग, जास्त करंट किंवा कोणत्याही टेक्निकल समस्येतून फोनची रक्षा करते. या उलट, Android केबल्स केवळ बेसिक किंवा फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, त्यामुळे ही चार्जिंग टेक्नॉलॉजी iPhone च्या चार्जिंग टेक्नॉलॉजी सोबत जुळत नाही. अनेकदा अँड्रॉइड स्मार्टफोनच्या चार्जिंग केबल्स मधून जास्त करंट पास होऊ शकतो, ज्यामुळे iPhone ची चार्जिंग IC डॅमेज होऊ शकते. यामुळे तुमच्या iPhone ची बॅटरी लाइफ कमी होऊ शकते आणि डिव्हाईस पूर्णपणे डेमेज होऊ शकते.
टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ञाचे देखील असे मत आहे की, iPhone मध्ये जी चार्जिंग सिस्टम असते, ती अतिशय नाजुक आणि सेंसेटिव असते. जर तुम्ही कोणतेही स्वस्त किंवा लोकल Android वाला Type-C केबलचा वापर केला तर तुमच्या iPhone ची चार्जिंग सिस्टिम खराब होऊ शकते. बॅटरी गरम होऊ शकते, चार्जिंग पोर्ट खराब होऊ शकतो किंवा फोनमध्ये शॉर्ट सर्किट देखील होऊ शकते. यामुळे Apple कंपनीने देखील अस सांगितलं आहे की, iPhone चार्ज करण्यासाठी केवळ त्यांच्या ओरिजिनल केबल किंवा अशा चार्जरचा वापर करा जो “MFi Certified”असेल, म्हणजेच खास करून हा चार्जर iPhone साठी तयार करण्यात आला असेल.
आता असा प्रश्न उपस्थित होतो की आपत्कालीन परिस्थितीत आपण iPhone चार्ज करण्यासाठी एक किंवा दोन वेळा Android किंवा Type-C केबलचा वापर करू शकतो का? जर एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल आणि तुमच्याकडे iPhone चा चार्जर नसेल तर तुम्ही एक किंवा दोन वेळा iPhone चार्ज करण्यासाठी Android किंवा Type-C केबलचा वापर करू शकता. मात्र लक्षात ठेवा अस तुम्ही केवळ एक किंवा दोन वेळा करू शकता. जर तुम्ही सतत iPhone चार्ज करण्यासाठी अँड्रॉइड किंवा टाईप सी चार्जर वापरल्यास iPhone खराब होऊ शकतो. यामुळे नेहमी लक्षात ठेवा की iPhone चार्ज करण्यासाठी Apple चा ओरिजिनल चार्जर किंवा “MFi Certified” केबल चाच वापर करा. ज्यामुळे तुमचा iPhone लवकर खराब होणार नाही आणि सुरक्षित राहील.