ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Samsung S24 Ultra वर तब्बल 24 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यांना एक ऑलराउंडर फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही बेस्ट डिल असणार आहे. Samsung S24 Ultra स्मार्टफोन 1,34,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. तर सॅमसंग स्टोअर्समध्ये या स्मार्टफोनची किंमत सुमारे 1,09,999 रुपये आहे. मात्र आता 45 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या आकर्षक डिलबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिल्सबद्दल बोलायचं झालं तर लाखो रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता केवळ 89,997 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहक हा स्मार्टफोन लाँचिंग किंमतीपेक्षा 45 हजार रुपयांनी कमी आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनच्या खरेदीवर खास बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे डिव्हाईस आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. कंपनी फ्लिपकार्ट अॅक्सिस किंवा एसबीआय कार्ड वापरण्यावर 4,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यामुळे किंमत फक्त 85,997 रुपयांपर्यंत कमी होत आहे.
डिव्हाईसच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देखील देण्यात आला आहे, जो अत्यंत पावरफुल आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये Adreno 750 GPU आहे. गेमिंग आणि जास्त कामाच्या ताणादरम्यानही हे डिव्हाइस स्मूथ परफॉर्मंस ऑफर करतो.
फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा, 50MP चा पेरिस्कोप लेंस, 10MP चा टेलीफोटो कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाइड लेंस दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 12MP चा सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.






