WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अॅक्सेस?
सायबर सिक्योरिटी फर्म Gen Digital ने या नवीन सायबर स्कॅमबाबत माहिती दिली आहे. यामध्ये यूजर्सची फसवणूक करणं अत्यंत सोपं आहे. या स्कॅमबाबत अधिक जाणून घेऊया. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर सुरु असलेल्या या स्कॅमचं नाव Ghost Pairing Scam असं आहे. या स्कॅममध्ये लोकांना त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या नावाने मेसेज पाठवला जातो आणि त्यानंतर एक लिंक पाठवून अकाऊंट हॅक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले जातात. या स्कॅममध्ये यूजर्सचं अकाऊंट हॅक करण्यासाठी ओटीपीची देखील आवश्यकता नसते. हा स्कॅम कसा केला जातो, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp चा अकाऊंट अॅक्सेस मिळवण्यासाठी सुरु असलेल्या या स्कॅमला Ghost Pairing Scam म्हटलं जात आहे. यामध्ये हॅकर्स यूजर्सना त्यांच्या विश्वसनीय लोकांच्या नावाने मेसेज पाठवतात. यानंतर प्रिव्यू पाहण्यासाठी आग्रहक केला जातो. जेव्हा यूजर्स प्रिव्यू पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करतात तेव्हा कोणत्याही ऑथेंटिकेशन किंवा ओटीपीशिवाय यूजर्सच्या अकाऊंटकचा अॅक्सेस हॅकर्सकडे जातो. कारण प्रिव्यू पाहण्यासाठी यूजर्सना स्वत:ला व्हेरिफाय करावं लागतं. हे व्हेरिफिकेशन बॅकएंडला सुरु असते आणि तुमचे व्हॉट्सप हॅकरच्या डिव्हाइसवर लॉगिन होते. त्यानंतर हॅकर्सना तुमच्या अकाऊंटचा अॅक्सेस मिळतो, ज्यामुळे हॅकर्स तुमची संपूर्ण लीक करू शकतात, ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणत नुकसान होऊ शकतं. मेसेजवर पाठवले जाणारे प्रिव्यू लिंक खोट्या असतात, ज्यावर क्लिक करताच तुमचं अकाऊंट हॅक होतं. खरं तर हॅकर्स यूजर्सना त्यांच्या विश्वसनीय लोकांच्या नावाने मेसेज पाठवतात, त्यामुळे लिंकवर अगदी सहज विश्वास ठेवला जातो.
Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर
जर तुम्हाला कोणत्याही नंबरवरून प्रिव्ह्यु पाहण्यासाठी मेसेज आला तर लिंकवर क्लिक करू नका. ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्ह्यू पाहण्यास सांगितले जाते, असे मेसेज उघडणे टाळावे. तुम्हाला ज्या व्यक्तिच्या नावाने मेसेज आला आहे. त्याला कॉल करून विचारा, की त्या व्यक्तीने खरंच मेसेज पाठवला आहे की नाही. जर तुम्हाला कधीही मेसेज पाहण्यासाठी तुमच्या खात्याची व्हेरिफिकेशन करण्याची सूचना दिसली, तर ती व्हेरिफिकेशन करणे टाळा.
Ans: फसवणूक करून युजर्सची माहिती, पैसे किंवा अकाउंट ताब्यात घेण्याचा प्रयत्न म्हणजे WhatsApp स्कॅम.
Ans: हो, फेक लिंक, QR कोड किंवा सेटिंग्स ट्रिकद्वारे अॅक्सेस मिळवला जाऊ शकतो.
Ans: फेक जॉब ऑफर, लॉटरी, KYC अपडेट, अकाउंट व्हेरिफिकेशन लिंक.






