गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
तुम्ही देखील GTA 6 ची अगदी आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमची प्रतिक्षा संपणार आहे. कारण लवकरच GTA 6 लाँच केला जाणार आहे. गेमर्स गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची वाट बघत होते, तो क्षण आता लवकरच येणार आहे. येत्या काही महिन्यांतच बहुप्रतीक्षित गेम GTA 6 लाँच केला जाणार आहे. या गेमच्या आगामी लाँचिंगबाबत इंटरनेटवर अनेक अपडेट शेअर केले जात आहेत. या अपडेट्समुळे गेमिंग वर्ल्डमध्ये आतुरता निर्माण झाली आहे. या गेमच्या किंमतीपासून, गेमप्ले, कॅरेक्टर्स आणि एडिशनपर्यंत बरीच माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. चला तर मग आता ही माहिती जाणून घेण्याची वेळ आली आहे.
GTA 6 मध्ये पहिल्यांदाच एका महिलेचे मुख्य कॅरेक्टर लूसिया (Lucia) सादर केले जाणार आहे. या कॅरेक्टरसोबत तिचा पार्टनर जेसन (Jason) देखील पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही कॅरेक्टर खऱ्या गुन्हेगारी जोडी बोनी आणि क्लाइडपासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. याशिवाय गेममध्ये राउल बटिस्टा, कॅल हॅम्पटन, आणि बूबी आइकसारखे इत्यादी मजेदार कॅरेक्टर्स देखील असणार आहे. गेममधअये दिवस आणि रात्रीचे बदलते वातावरण, वास्तववादी हवामान आणि आश्चर्यकारक अॅनिमेशन यामुळे ते आणखी आकर्षक होईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात मजेदार लीक हे आहे की, GTA 6 मध्ये एक इन-गेम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणार आहे. ज्याचा वापर गेमचे कॅरेक्टर्स करू शकणार आहेत. यासोबतचं, लूसिया आणि जेसन यांच्यामध्ये एक ‘लव मीटर’ किंवा रिलेशनशिप मीटर देखील जोडला जाणार आहे, ज्याचा कथेच्या दिशेवर परिणाम होईल, म्हणजेच खेळाडूचे निर्णय आता कथेत बदल घडवू शकतात.
GTA 6 मध्ये Vice City पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. जिथे चमकणे, लग्जरी लाइफस्टाइल आणि गुन्हेगारी जगाची साथ पाहायला मिळणार आहे. याशिवाय गेममध्ये माउंट कालागा, अॅम्ब्रोसिया, ग्रासनद्या आणि पोर्ट गेलहॉर्नसारखे नवीन क्षेत्र जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे हे ओपन-वर्ल्ड आधीपेक्षा खूप जास्त मोठा आणि मेजदार होणार आहे.
सुरुवातीला GTA 6 हे प्लेस्टेशन ५, पीएस५ स्लिम, पीएस५ प्रो, एक्सबॉक्स सिरीजसाठी रिलीज केले जाणार आहे. तर PC वर्जन गेम रिलीजनंतर सुमारे दीड वर्षांनी लाँच केले जाण्याची शक्यता आहे. Rockstar Games ने सांगितलं आहे की, GTA 6 हा गेम 26 मे 2026 पर्यंत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा गेम तीन एडीशनमध्ये उपलब्ध असणार आहे, ज्याच्या किंमती Standard Edition 8,999 रुपये, Deluxe Edition 13,999 रुपये आणि Collector’s Edition सुमारे 39,999 रुपये असणार आहे. Collector’s Edition मध्ये विशेष बोनस आइटम्स, एक्सक्लूसिव कार स्किन्स आणि प्रीमियम गेमिंग कंटेंट मिळण्याची शक्यता आहे.