WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच
सोशल मीडिया युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या युजर्सची सुरक्षा टिकून राहावी यासाठी सोशल मीडिया कंपन्या सतत प्रयत्न करत असतात. सहसा सोशल मीडिया युजर्सना सतत स्कॅमच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. युजर्सची हीच समस्या सोडवण्यासाठी आता टेक कंपनी मेटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसह मेटाच्या प्लॅटफॉर्मवर आता चॅटिंग करणं अधिक सुरक्षित होणार आहे. कंपनीने त्यांच्या युजर्सची स्कॅमपासून सुरक्षा व्हावी यासाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर विशेषत: सीनियर सिटीजन्सची सुरक्षा लक्षात ठेऊन सादर करण्यात आले आहे.
WhatsApp वर जर एखाद्या कॉलरने व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर केली तर त्यावेळी युजर्सना अलर्ट पाहायला मिळणार आहे. डिजिटल अरेस्टसारख्या इत्यादी घटनांमध्ये स्कॅमर्स व्हिडीओ कॉलदरम्यान लोकांना टार्गेट करतात आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा घटनांदरम्यान कंपनीचं हे नवीन फीचर फायद्याचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मेसेंजरबद्दल बोलायचं झालं तर कंपनी चॅट्ससाठी AI पावर्ड स्कॅम डिटेक्शन टूल तयार करत आहे. यामध्ये कोणत्याही नव्या संपर्कासोबत केली जाणारी चॅटिंग AI रिव्यूसाठी पाठवली जाऊ शकते. यामध्ये जर कोणती गडबड असल्याचे आढळले तर युजर्सना त्याप्रकारे गाईड केलं जाणार आहे.
मेटा ने फेसबुक, मेसेंजर आणि व्हाट्सअपसह त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मसाठी पासकी (Passkey) सपोर्ट रोल आउट केला आहे. यामध्ये यूजर फेस वेरिफिकेशन किंवा फिंगरप्रिंट सारखे डिवाइस-लेवल ऑथेंटिकेशनद्वारे साइन-इन करू शकणार आहेत. मेटाने लोकांकडून
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सिक्योरिटी चेकअप आणि व्हाट्सअपवर प्रायवसी चेकअपचा वापर करण्यासाठी अपील करू शकणार आहेत.
मेटाने सांगितलं आहे की, हे दूरसंचार विभागसह मिळून ‘स्कॅमपासून संरक्षण करा’ अभियान चालवणार आहे. यामध्ये सीनियर सिटीजन्सना व्हिडीओ कंटेटद्वारे स्कॅम ओळखण्यासाठी आणि त्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याच्या पद्धतींबाबत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, कंपनी सक्षम ज्येष्ठ नागरिक मोहिमेला देखील पाठिंबा देईल, जी ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता आणि सुरक्षा सत्रे चालवते.
सोशल मीडिया कंपनी मेटाने तरुण वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर्स सादर केले आहेत. या बदलांमुळे पालकांना एआय चॅटबॉट्स वापरून त्यांच्या मुलांच्या खाजगी चॅट्स बंद करता येतील. मुलांच्या सुरक्षिततेबाबत कंपनीला वाढत्या तपासणीचा सामना करावा लागत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मेटाने जाहीर केले आहे की पुढील वर्षापासून, पालकांना त्यांच्या मुलांच्या एआय कॅरेक्टरसह एक-एक चॅट बंद करण्याचा पर्याय असेल.