आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर
तुम्ही पाहिले असेल की स्मार्टफोन कंपन्या लाँचपूर्वी त्यांचा स्मार्टफोन रिव्हील करत नाही. कारण स्मार्टफोन पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसावा असं कंपन्यांना सतत वाटतअसतं. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा आता गूगल बदलणार आहे. कारण गुगल आता एक नवीन ट्रेंड सेट करण्याच्या प्रयत्नात आहे. खरं तर कंपनी त्यांचा पिक्सेल टेस्टिंग प्रोग्राम सर्व ग्राहकांसाठी सुरु करण्याचा विचार करत आहे. असं सांगितलं जात आहे की, 15 आउटसाइडर लाँचपूर्वी पिक्सेल फोनची टेस्टिंग करू शकणार आहेत. गूगलने यासाठी त्यांच्या ट्रस्टेड टेस्टर प्रोग्रामसाठी 15 सुपरफॅनची भर्ती देखील सुरु केली आहे. हे सुपरफॅन स्मार्टफोनची टेंस्टिंग करून इतर ग्राहकांना फीडबॅक देखील देऊ शकणार आहे.
आता तुमचा प्रत्येक फोटो असणार परफेक्ट! फोटोग्राफीसाठी हे आहेत बेस्ट स्मार्टफोन, आजच करा खरेदी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सुपरफॅन्सना गूगलच्या टेस्टर प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये त्यांना एक नॉन-डिस्क्लोजर एग्रीमेंट मान्य करावे लागणार आहे आणि घरातून बाहेर पडताना त्यांच्या फोनला एका स्पेशल केसमध्ये ठेवावे लागणार आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन सर्वसामान्य लोकांच्या नजरेत येऊ नये. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गुगल दर 2-3 वर्षांनी त्यांची डिजाइन लँग्वेज बदलते. त्यामुळे, बाहेरील लोकांचे मत ऐकून, कंपनी डिझाइनमध्ये आवश्यक बदल करू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
गूगलच्या या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी तु्म्हाला पिक्सेल डिवाइसेससाठी असलेली तुमची क्रेझ सिद्ध करावी लागणार आहे. खरं तर या प्रोग्राममध्ये केवळ तेच लोकं सहभागी होऊ शकतात,ज्यांना पिक्सेल उपकरणांची सखोल समज आहे आणि ते कंपनीला त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत महत्त्वाचा सल्ला देऊ शकतात. या प्रोग्राममध्ये सहभागी होणारे लोकं पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लाँच होणाऱ्या पिक्सेल 11 सीरीज आणि पिक्सेल 10a ची चाचणी करण्याची संधी मिळवू शकतात.
सहसा छोट्या कंपन्या प्रोडक्ट फीडबॅकसाठी त्यांच्या लॉयल कस्टमर्सची मदत घेतात. मात्र मोठ्या कंपन्या असं निर्णय घेत नाही. मात्र आथा गुगलने हा निर्णय घेतला आहे. तथापी, गूगलच्या या प्रोग्राममध्ये कॉन्फिडेंशियलिटी कायम ठेवणं एक मोठं आव्हान असणार आहे. कारण लॉन्च होण्यापूर्वीच, गुगलच्या पिक्सेल फोनचे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन अनेक वेळा लीक झाले आहेत.
गुगलने घेतलेल्या या निर्णयामुळए इतर सर्व कंपन्यांसोबतच ग्राहक देखील प्रचंड उत्सुक आहेत. कदाचित असं पहिल्यांदाच होणार असेल जेव्हा ग्राहकांना लांच होण्यापूर्वी एखादा स्मार्टफोन टेस्ट करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने घेतलेला हा निर्णय खरंच फायद्याचा ठरणार का? की या निर्णयामुळे कंपनीसा मोठं नुकसान सहन करावं लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.