Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
स्मार्टफोन कंपनी Motorola ने जुलै महिन्यात चीनमध्ये Moto G100 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेल्या Moto G86 Power चा रीब्रँड वर्जन होता. कंपनीने हा स्मार्टफोन मोठ्या बॅटरीसह मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला होता. आात कंपनीने या सिरीजमधील आणखी एक नवीन मॉडेल लाँच केले आहे. नवीन स्मार्टफोन Moto G100 या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन अनेक हार्डवेयर अपग्रेड्ससह मिड रेंज सेगमेंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या नवीन स्मार्टफोनची किंमत किती आहे, त्यामध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत आता आपण सविस्तर जाणून घेऊया.
मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट’, युजर्ससाठी वाढला हॅकिंगचा धोका
Moto G100 स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1050 निट्स आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल स्टीरियो स्पीकर देण्यात आले आहे. जो बॅलेंस ऑडियो एक्सपीरियंस ऑफर करतो. (फोटो सौजन्य – X)
Moto G100 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. हा नवीन मॉडेल अनेक महत्वपूर्ण हार्डवेयर अपग्रेड्ससह लाँच करण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन 12GB ची LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज ऑफर करतो.
कंपनीने या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 15 वर आधारित कंपनीच्या नियर-स्टॉक यूआई वर चालतो.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर Moto G100 या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-600 प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्यासोबत 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देखील देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन NFC, साइड माउंटेड फिंगरप्रिंट, ग्रेफाइट कूलिंग आणि IP64 डस्ट आणि स्लॅश रजिस्टेंसला सपोर्ट करतो.
Moto G100 स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज याचा समावेश आहे. या व्हेरिअंटची किंमत 1,339 युआन म्हणजेच सुमारे 17 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.