13,499 रुपयांच्या किंमतीत Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, 7000mAh बॅटरी आणि असा आहे कॅमेरा सेटअप, कलर ऑप्शन पाहून व्हाल चकित
Realme C83 5G स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे, या स्मार्टफोनच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,499 रुपये आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,499 रुपये ठेवण्यात आली आहे. Realme च्या C सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री भारतात 7 एप्रिलपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन रिअलमीची अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकतात. Realme C83 5G स्मार्टफोन ब्लूमिंग पर्पल आणि स्प्राउटिंग ग्रीन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. (फोटो सौजन्य – Realme )
Realme C83 5G स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच HD+ (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 900 निट्स आहे. फोनचा डिस्प्ले 16.7 मिलियन कलर्स सपोर्टसह उपलब्ध आहे आणि याचाटच सँपलिंग रेट 180Hz आहे.
Realme C83 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट आहे, जो 6GB RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो, जो मायक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येतो. Realme C83 5G स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी ARM Mali-G57 MC2 GPU दिला आहे.
रियलमी C83 5G स्मार्टफोनम्ये सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याचा अपर्चर f/2.2 आहे आणि हा 77-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि ऑटो फोकसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या रियलमी फोनसह 30 fps वर 1080p व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
रियलमी C83 5G स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची टायटॅन बॅटरी दिली आहे. हा फोन 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित रियलमी UI 7.0 वर चालतो.
हा रियलमी फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 5G, 4G LTE, USB Type-C पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक, बेईडौ, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि क्यूझेडएसएस कनेक्टिव्हिटी देतो.






