आजच्या या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन ही आपली गरज बनली आहे. आजकल आपली बरेच काम आपण स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज आणि कमी वेळेत पूर्ण करू शकतो. याच्या मदतीने बरीच कामे घरबसल्या करता येतात. आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येकाला आपली काम लवकर झटपट व्हावी असे वाटतं असते. अशात जर आपला स्मार्टफोन स्लो चालत असेल तर अनेकांना ते त्रासदायक वाटू लागते.
तुम्ही कितीही महागडा स्मार्टफोन खरेदी केला तरी काळासोबत त्याचा वेग कमी होतो. त्यानंतर नवीन फोन घेण्याचा दबाव वाढू लागतो. मात्र, नवीन फोन घेण्याचा विचार करण्याआधी जुन्या फोनमध्येच काही सेटिंग्ज बदलल्यास वेग पूर्वीसारखाच होऊ शकतो. चला, त्या पद्धतींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमच्या जुन्या फोनचा वेग सुपरफास्ट होण्यास मदत होईल. तुमच्या स्मार्टफोनची गती वाढवण्यास या टिप्सचा तुमच्या कामी येतील.
बॅटरी
जर स्मार्टफोनची बॅटरी नीट काम करत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या फोनच्या परफॉर्मन्सवरही दिसून येईल. वेग वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी बदलू शकता
डिस्प्ले
डिस्प्लेमध्ये थोडासा दोष देखील फोनचा वेग कमी करू शकतो. त्यामुळे, चांगल्या कामगिरीसाठी, डिस्प्ले सुरळीतपणे काम करत राहणे महत्त्वाचे आहे
फोन रीसेट करा
फोन रिसेट केल्याने आपल्या स्मार्टफोनमधील डेटा मिटतो, मात्र यामुळे स्मार्टफोनचा वेग पूर्वीपेक्षा खूपच चांगला होईल
असाही वेग वाढू शकतो

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
ऑपरेटिंग सिस्टम
वेग सुधारण्यासाठी, फोन नेहमी नवीनतम OS वर वापरला पाहिजे.
अनावश्यक ॲप्स
तुमच्या फोनमध्ये अनावश्यक ॲप्स असतील तर ते काढून टाकल्याने फोनचा वेग वाढू शकतो.
कॅशे मेमरी क्लिअर करा
फोनची कॅशे मेमरी क्लिअर केल्याने फोनचा स्पीड वाढण्यास मदत होईल.
बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स
फोनच्या बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स बॅटरी आणि डेटा वापरतात. ज्याचा परिणाम फोनचा परफॉर्मन्सवरही होतो. हे ॲप्स बंद केल्याने फोनचा वेग वाढू शकतो.
जड ॲप्स ठेवू नका
काही युजर्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हेवी ॲप्स इन्स्टॉल करून ठेवतात, जे भरपूर स्टोरेज स्पेस व्यापतात आणि वेग कमी करतात. त्यामुळे त्यांना हटवणे हा योग्य पर्याय आहे.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
नियमित या ट्रिक्स फॉलो करा






