Tech Tips: Google Pay मध्ये डेबिट कार्डशिवाय बदलायचा UPI पिन? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
जर तुम्ही तुमच्या यूपीआय अकाऊंटचा पिन विसरला असाल आणि तुम्हाला हा पिन बदलायचा असेल तर सहसा तुम्हाला डेबिट कार्डची गरज असते. पण आता आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही डेबिट कार्डशिवाय यूपीआय अकाऊंटचा पिन बदलू शकणार आहात. गुगल पे सोबतच हे फीचर इतर ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगल पेमध्ये यूपीआय अकाऊंटचा पिन बदलण्यासाठी जर तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तर तुम्ही आधार व्हेरिफिकेशनचा वापर करू शकता. आधार व्हेरिफिकेशनचा वापर करून गुगल पेमध्ये यूपीआय पिन बदलला जाऊ शकतो. जर तुम्हाला अतिशय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला जेव्हा यूपीआय पीन बदलायचा असतो आणि तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल अशा परिस्थितीत तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधारद्वारे पिन जनरेट करण्याचा ऑप्शन सर्व बँका देत नाहीत. जर तुम्ही बँक ग्राहकांना ही सुविधा देत असेल तरच तुम्ही डेबिट कार्डशिवाय तुमचा यूपीआय पीन बदलू शकता. यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
स्टेप 1. सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये गुगल पे ओपन करा आणि लॉगिन करा.
स्टेप 2. अॅपच्या होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला, तुम्हाला प्रोफाइल फोटोवर टॅप करावे लागेल आणि ज्या बँक खात्याचा UPI पिन तुम्हाला बदलायचा आहे तो बँक खाते निवडावा लागेल.
स्टेप 3. बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्सच्या पेजवर फॉरगॉट यूपीआय पिन ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा.
स्टेप 4. जर तुम्हाला बँक आधार वेरिफिकेशन पद्धत सपोर्ट करत असेल तर फॉरगॉट यूपीआय पिन ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आधार व्हेरिफिकेशनवर क्लिक करा.
स्टेप 5. आता तुम्हाला आधारमधील पहिले 6 अंक एंटर करून संपूर्ण डिटेल्स सेव्ह करावे लागतील.
स्टेप 6. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला नवीन पिन जनरेट करण्याचा पर्याय मिळणार आहे.
ही पद्धत अशा यूजर्ससाठी आहे, ज्यांनी गूगल पेमध्ये बँक अकाऊंट आधार व्हेरिफिकेशनद्वारे जोडले आहे. याव्यतिरिक्त, आधारसोबत तोच नंबर लिंक असला पाहिजे जो तुम्ही बँकेत नोंद केला आहे. असे असेल तरच तुम्हाला ओटीपी मिळणार आहे, अन्यथा, तुम्हाला ओटीपी मिळणार नाही.
Ans: Google Pay हा UPI-आधारित डिजिटल पेमेंट अॅप आहे ज्याद्वारे पैसे पाठवणे, बिल पेमेंट, रिचार्ज इत्यादी करता येतात.
Ans: अॅप इन्स्टॉल करून → मोबाईल नंबर व्हेरिफाय → बँक निवडा → UPI PIN सेट करा. एवढे केल्यावर तुमची UPI ID तयार होते.
Ans: पे टू कॉन्टॅक्ट / UPI ID / QR स्कॅन → रक्कम भरा → UPI PIN टाका → पेमेंट पूर्ण.






