Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हेरगिरी करणारे अॅप्स इंस्टॉल असतील तर तुम्हाला काही संकेत दिले जातात. या संकेतांच्या मदतीने फोनमधील अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवून हेरगिरी करणारे अॅप्स ओळखू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुमच्या फोनमध्ये कोणताही हेरगिरी करणारा अॅप इंस्टॉल असेल तर तुमचा फोन अचानक रीबूट किंवा शटडाऊन होऊ शकतो. यासोबतच फोनमध्ये अनेकदा असामान्य व्यवहार होतात, जसे कोणत्याही नोटिफिकेशनशिवाय फोनचा डिस्प्ले ऑन होतो. हे संकेत तुमच्या फोनमध्ये एखादा स्पायवेअर किंवा त्यासंबंधित अॅप्स असल्याची माहिती देतात.
जर तुमच्या फोनची बॅटरी वेगाने संपत असेल तर ही चिंतेची बाब आहे. जर एखादा अॅप गरजेपेक्षा जास्त बॅटरी वापरत असेल तर शक्यता आहे की, हा अॅप तुमची हेरगिरी करू शकतो. फोनच्या सेटिंग्समधील बॅटरी ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की, कोणता अॅप जास्त बॅटरी वापरत आहे. यामुळे तुम्हाला अगदी सहज हेरगिरी करणाऱ्या अॅप्सची माहिती मिळणार आहे.
जर तुमच्या फोनमधील डेटा वापर अचानक वाढला असेल तर तुमच्या फोनमध्ये एखादा हेरगिरी करणारा अॅप असल्याचा हा संकेत आहे. अशा परिस्थितीत शक्यता आहे की, हेरगिरी करणारा अॅप तुमच्या फोनमधून डेटा ट्रांसफर करण्यासाठी डेटाचा वापर करत आहे. फोनमधील डेटा मॅनेजमधून तुम्ही पाहू शकता की, कोणता अॅप जास्त डेटाचा वापर करत आहे. जर तुम्हाला इथे काही संशयास्पद वाटलं तर तुमच्या फोनमध्ये हेरगिरी करणारा अॅप किंवा मालवेअर असण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये अनोळखी किंवा संशयास्पद फाईल्स आणि एसएमएस दिसत असतील तर तुमच्या फोनमध्ये हेरगिरी करणारे अॅप्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये सेव्ह असलेल्या फाईल्स वेळोवेळी तपासत राहा. तसेच गरज नसलेल्या फाईल्स डिलीट करा. त्यामुळे जर तुमच्या फोनमध्ये अनोळखी किंवा संशयास्पद फाईल्स असतील तर तुम्हाला अगदी सहज समजू शकेल. याशिवाय तुमचा मेसेज फोल्डर देखील वेळोवेळी तपासत राहा. जर तुम्हाला फोल्डरमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या तर सावध व्हा.
कॉलिंगदरम्यान जर तुम्हाला काही असामान्य आवाज येत असतील तर शक्यता आहे की तुमच्या कॉलवर नियंत्रण ठेवलं जात आहे. अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे आपपल्याला फोनमध्ये व्यवस्थित आवाज ऐकू येत नाही. मात्र हे प्रत्येकवेळी घडत असेल तर सावध व्हा. हा तुमच्यासाठी संकेत असू शकतो.
सर्व फोनमध्ये प्रायव्हसीसाठी कॅमेरा किंवा मायक्रोफोनचा वापर केला जात असेल तेव्हा स्क्रीनवर ग्रीन आणि ऑरेंज कलरचा डॉट दिसतो. पण जर एखाद्या कारणामुळे तुमच्या फोनमध्ये हे चिन्ह दिसत नसतील तर तुमच्या फोनमधील एखादा अॅप तुमचा आवाज रेकॉर्ड करत आहे किंवा तुमचा व्हिडीओ रेकॉर्ड केला जात आहे. तुम्हाला जर तुमच्या फोनमध्ये कोणतेही हेरगिरी करणारे किंवा संशयास्पद अॅप्स आढळले तर सर्वात आधी हे अॅप्स डिलीट करा.
Ans: स्मार्टफोनवर चालणारे कोणतेही सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम म्हणजे अॅप. उदा. WhatsApp, Instagram, YouTube.
Ans: Android साठी Google Play Store आणि iPhone साठी Apple App Store हे सर्वात सुरक्षित स्रोत आहेत.
Ans: बहुतांश सुरक्षित असतात, परंतु काही अॅप्स अनावश्यक परमिशन घेतात. इन्स्टॉल करण्यापूर्वी रेटिंग, रिव्ह्यू आणि परमिशन तपासा.






