Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट... जाणून घ्या सविस्तर
सर्वात आधी एसीचा फिल्टर काढा आणि चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. घाणेरडा फिल्टर गरम हवा योग्य पद्धतीने खेचून घेत नाही. ज्यामुळे एसीला कुलिंग करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. जर तुम्ही अति प्रमाणात एसीचा वापर करत असाल तर आठवड्यातून किमान एकदा एसीचा फिल्टर आवश्य साफ करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी एसी कोणत्या मोडवर चालू आहे हे तपासा. तुम्ही चुकून एसी फॅन मोडवर सेट केला असेल तर कुलिंग होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे जर एसी स्लो कुलिंग करत असेल किंवा थंड होत नसेल तर सर्वात आधी एसीचा मोड तपासा. कुलिंग होण्यासाठी एसी कूल मोडवर असणे आणि तापमान 24 ते 26°C दरम्यान सेट असणे गरजेचे आहे. एसी चुकीच्या मोडवर सेट असल्यास कुलिंग होत नाही.
केवळ इंडोर यूनिट स्वच्छ करणं पुरेसे नाही. एसीच्या इंडोर यूनिट स्वच्छतेसोबतच एसीच्या बाहेरील युनिटची वेळोवेळी स्वच्छता करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. एसीवर साचलेली धूळ, पाने किंवा घाण काढून टाकण्यासाठी पूर्णपणे स्वच्छता करणं गरजेचं आहे.
एसीचा वापर करताना नेहमी लक्षात ठेवा की, खोलीचे दरवाडे आणि खिडक्या बंद असतील. ज्यामुळे थंड हवा खोलीबाहेर जाणार नाही. जर खोलीतून थंड हवा सतत बाहेर जात राहिली, तर खोली थंड होणार नाही.
याशिवाय, खोलीमध्ये हवेचा योग्य संचार होत असल्याची खात्री करा आणि एसीचे व्हेंट्स पडदे किंवा फर्निचरमुळे अडवलेले नाहीत याची काळजी घ्या. शक्य असल्यास एसीसोबत पंख्याचा देखील वापर करा.






