Tech Tips: वीज बिलाची चिंता सोडा! 3-स्टार की 5-स्टार, तुमच्यासाठी कोणता एसी बेस्ट? अशी करा योग्य निवड
एनर्जी कंजप्शन आणि विजेचे बिल हे या दोन्ही एसीमधील सर्वात मोठा फरक ठरणार आहेत. फाइव स्टार एसी अशा प्रकारे डिझाईन केलेला असतो की तो ॲडव्हान्स एनर्जी सेविंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने कमीत कमी विजेचा वापर करतात. तुलनेत थ्री स्टार एसी विजेचा जास्त वापर करतात. मात्र थ्री स्टार एसीची सुरुवातीची किंमत अत्यंत कमी असते. उन्हाळ्यात विजेचे बिल एसीचा वापर किती तास केला जातो, खोलीचा आकार आणि टेंपरेचर सेटिंग यावर अवलंबून असते. अनेक लोकं असतात जे एसी निवडताना रनिंग कॉस्ट आणि इन्वर्टर कंपॅटिबिलिटी तपासतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
दोन्ही एसीमधील दुसरा सर्वात मोठा फरक म्हणजे कुलिंग आणि कम्फर्ट. दोन्ही प्रकारचे एसी तुमची खोली अधिक चांगल्या प्रकारे थंड ठेवतात. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. फाईव्ह स्टार एसी सहसा अधिक वेगाने तुमची खोली थंड करते आणि अधिक चांगल्या सेंसरमुळे तापमान स्थिर ठेवले जाते. तर 3-स्टार AC बेसिक कूलिंगची सुविधा देते आणि तापमान तितक्या सहजतेने नियंत्रित करू शकत नाही.
याशिवाय खोलीचे इन्सुलेशन बाहेरील तापमान आणि पंख्याची सेटिंग देखील कम्फर्ट लेव्हल ठरवण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. दमट वातावरणात राहणाऱ्या लोकांना ही ऊर्जा-कार्यक्षमतेच्या वैशिष्ट्यांनुसार थंडाव्यात फरक जाणवू शकतो.
सुरुवातीची किंमत आणि लाँग-टर्म सेविंग्स यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फरक पाहायला मिळणार आहे. 5-स्टार एसीची सुरुवातीची किंमत जास्त असते. कारण यामध्ये अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वाापर केला जातो. तुलनेत 3-स्टार एसीची किंमत कमी असते, त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. त्यामुळे जर तुमचे बजेट कमी असेल तर 3-स्टार तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.
देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी
याशिवाय, तुमचा वापर आणि खोलीचा आकार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्हाला एसीचा वापर काही तासांसाठी करायचा असेल तर वीज बिलात फारसा फरक पडणार नाही. पण, जर तुमचा वापर दिवसातून अनेक तास असेल, तर 5-स्टार एसी हा एक चांगला पर्याय आहे, कारण तो वीज वाचवतो आणि दीर्घकाळात तुमच्या पैशांची बचत करतो.






