500 रुपयांची नोट असली की नकली? तुम्हीही गोंधळलात? Smartphone च्या मदतीने शोधा कोणती नोट आहे Fake, या आहेत Tricks 500 रुपयांची नोट असली की नकली? तुम्हीही गोंधळलात? Smartphone च्या मदतीने शोधा कोणती नोट आहे Fake, या आहेत Tricks
भारतीय बाजारात 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. भारतात 500 रुपयांच्या नोटांची संख्या सर्वाधिक असल्याचं सांगितलं जातं. काही वर्षांपूर्वी भारतात 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर भारत सरकारने 500 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवली. त्यामुळे सध्या भारतीय बाजारात 500 रुपयांच्या नोटांची संख्या सर्वाधिक आहे. पण यामुळेच मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होतो.
सामान्य लोकांची फसवूणक करण्यासाठी हुबेहुब खऱ्या नोटांसांरख्या दिसणाऱ्या नकली नोटा भारतीय बाजारात आहेत. या नकली नोटा पूर्णपणे खऱ्या नोटांसारख्या दिसतात. त्यामुळे सामान्य माणसांना या नोटांमधील फरक ओळखणं अत्यंत कठीण होतं. कारण या नकली नोटांवर इतकं बारकाईने कामं केलं जातं की, या नोटा अगदी खऱ्याप्रमाणे दिसू लागतात. पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने असली आणि नकली नोटांमधील फरक ओळखू शकता. पण यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारत सरकार आणि रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक अलर्ट देखील जारी केला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या नकली नोटांपाासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फाइनेंस मिनिस्ट्री द्वारा पब्लिश रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मार्केटमध्ये खोट्या नोटांचं सर्कुलेशन पुन्हा वाढलं आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे. तुम्ही अगदी काही सोप्या पद्धतीने आणि स्मार्टफोनच्या मदतीने नकली नोटा ओळखू शकता.
हाय-रिजॉल्यूशन कॅमेरा स्मार्टफोन तुम्हाला नकली नोटा ओळखण्यासाठी मदत करणार आहे. तुम्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने नोटवर झूम करून मायक्रो टेक्स्ट, अलाइनमेंट आणि प्रिंटिंग क्वालिटी तपासू शकता. याशिवाय स्मार्टफोनच्या प्लॅशच्या मदतीने सिक्योरिटी थ्रेड किंवा काही हाईलाइटिंग फीचर्सची ओळख पटवू शकता. याशिवाय 500 रुपयांच्या नोटेच्या खालच्या बाजूला अगदी लहान अक्षरांत RBI आणि 500 लिहीलेलं असतं. ही अक्षर अगदी लहान असतात त्यामुळे ही अक्षरं पाहण्यासाठी तुम्हाला कॅमेरा झूम करावा लागणार आहे. जर तुमच्याकडे असलेल्या नोटंवर ही अक्षरं लिहीलेली असतील तर तुमच्याकडे असलेली नोट खरी असणर आहे.
भारत सरकार आणि रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने लोकांना कोणताही रोख व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांना कोणतीही नकली नोट आढळली तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. लोकल दुकानदार, फुटपाथ वेंडर आणि कॅश डिपॉजिटच्या ट्रांजेक्शनवेळी योग्य खबरदारी घ्या. तुमची छोटी चूकही तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते.
RBI ने त्यांच्या ग्राहकांसाठी ‘MANI’ (Mobile Aided Note Identifier) अॅप लाँच केला आहे. हा अॅप अँड्रॉईड आणि iOS वर फ्रीमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या अॅपच्या मदतीने नोट स्कॅन करून तुम्ही त्याचे डेनॉमिनेशन (मूल्य) जाणून घएऊ शकता. हा अॅप दृष्टिबाधित (vision impaired) लोकांसाठी लाँच करण्यात आला आहे.