एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर
यासाठी तुम्ही मॅजिक इरेजर (Magic Eraser) टूलची मदत घेऊ शकता. हे एक असं टूल आहे, जे तुमचा फोटो सोशल मीडियासाठी एकदम परफेक्ट बनवते. सध्या सर्वच लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये हे टूल उपलब्ध असते. स्मार्टफोनच्या फोटो गॅलरीमध्ये मॅजिक इरेजर किंवा ऑब्जेट रिमुव्हर या नावाने हे टूल उपलब्ध असते. या टूलच्या मदतीने यूजर्स त्यांच्या फोटोमधील अनावश्यक वस्तू किंवा व्यक्ती हटवू शकतात. या टूलमुळे तुमच्या फोटोला परफेक्ट लूक मिळतो.
मॅजिक इरेजर एक असे टूल आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फोटोमधील अनावश्यक वस्तू किंवा व्यक्ती हटवू शकता. हे टूल AI वर आधारित आहे. हे टूल बॅकग्राउंडमध्ये दिसणारे लोगो, टेक्स्ट किंवा व्यक्ती फोटोमध्ये मर्ज करतात. ज्यामुळे फोटो अत्यंत स्पष्ट आणि प्रोफेशनल दिसतो. या टूलचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
मॅजिक इरेजर किंवा ऑब्जेक्ट रिमूवर गूगल फोटो अॅप आणि डेस्कटॉप साईटवर अत्यंत लोकप्रिय आहे. या टूलच्या मदतीने यूजर्स त्यांच्या फोटोचे रंगरूप पूर्णपणे बदलू शकतात. गूगल फोटोजध्ये मॅजिक इरेजर टूल कसं काम करतं, याबाबत आता जाणून घेऊया.






