India mock drill: Android आणि iOS वरही मिळणार इमरजेंसी अलर्ट, अशी आहे सेटिंग; स्टेप बाय स्टेप वाचा प्रोसेस
भारतात आज 7 मे 2025 रोजी देशभरात सिविल डिफेंस मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली आहे. देशातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता हे सिविल डिफेंस मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 4 वाजता सरकारने निवडलेल्या देशातील काही निवडक राज्यांमध्ये सायरन वाजवला जाणार आहे. ज्यावेळी युद्ध होतं किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळी जसं सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जातं, त्याचप्रमाणे आज भारतातील काही निवडक भागात सिविल डिफेंस मॉक ड्रिल आयोजित केलं जाणार आहे.
भारताने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदू राबवलं आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. त्यानंतर आज भारतात सिविल डिफेंस मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली आहे. पहलगाम टेररिस्ट हल्ल्यानंतर देशाची आत्मरक्षा आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि देशवासीयांना जागरुक करण्यासाठी सिविल डिफेंस मॉक ड्रिलची घोषणा केली आहे. यावेळी ड्रिलमध्ये ब्लॅकआउट सिमुलेशन, हवाई हल्ल्यांदरम्यान वाजवला जाणार सायरन, एवकाशन ड्रिल्स आणि पब्लिक सेफ्टी सेशंस यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक राज्यांमधील शहरांमध्ये सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जाणार आहे. अशावेळी तुमच्या मोबाईल डिव्हाईसवर देखील अलर्ट दिला जाणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये अगदी छोटी सेटिंग करून स्मार्टफोनमध्ये देखील इमरजेंसी अलर्ट अॅक्टिव्ह करू शकणार आहात. याचे अनेक फायदे आहेत.
सरकारने केलेल्या आयोजनानुसार, देशातील काही निवडक राज्यांमधील शहरांमध्ये सायरन वाजवला जाणार आहे. सरकारद्वारे मोठी संकट म्हणजेच भूकंप, पूर, टेररिस्ट अटॅक किंवा हरवलेल्या व्यक्तिबद्दल माहिती देण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी अलर्ट पाठवला जातो. हे अलर्ट एक खास नेटवर्कचा वापर करतात, ज्यामुळे ज्याला मोबाइल नेटवर्कवर हेवी ट्रॅफिक असताना देखील तुम्हाला अलर्ट पाठवला जातो. तुम्ही एका सोप्या सेटिंगच्या मदतीने तुमच्या मोबाईलवर अलर्ट सुरु करू शकता.