Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स
2025 या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण आज म्हणजेच रविवार 21 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षाचे शेवटचे ग्रहण पितृपक्ष आणि महालयाच्या समाप्तीच्या दिवशी पडत आहे. ज्योतीष्यांनी सांगितलं आहे की, हे सूर्यग्रहण दूरगामी परिणाम करू शकते. म्हणजेच यामुळे मानवी जीवनात आणि भविष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो.
ज्योतीष्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण आज म्हणजेच रविवार 21 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजून 39 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे शेवटचे ग्रहण दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 29 मिनिटांनी संपणार आहे. वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण सुमारे 5 तास असणार आहे. हे ग्रहण तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टिव्हीवर लाईव्ह बघू शकणार आहेत, यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टिव्हीवर लाईव्ह कसे बघू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी भारतात सूर्यग्रहण प्रत्यक्षपणे दिसणार नाही. ग्रहण सुरु होण्याच्या 12 तास आधीच सूतक काळ सुरु होणार आहे. ग्रहण संपल्यानंतर नवरात्री 2025 ची सुरुवात होणार आहे. या दिवशी दुर्गापूजा सुरू होते, तर यावर्षी दसरा 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे.
यावर्षी भारतात सूर्यग्रहण दिसणार नसलं तरी देखील तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टिव्हीवर लाईव्ह बघू शकणार आहेत. सूर्यग्रहणाची लाईव्ह स्ट्रिमिंग Timeanddate च्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध असणार आहे. हे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश