ऑनलाईन घोटाळ्यांसंदर्भात जनजागृती (फोटो सौजन्य - iStock)
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने स्थापन केलेले इंडियन सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) आणि अमेझॉन इंडिया यांनी एकत्र येऊन #ScamSmartIndia ही देशव्यापी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्यापासून ग्राहकांचे संरक्षण करणे आहे. हे भागीदारी उपक्रम फसवणुकीबाबतची साक्षरता समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर केंद्रित असून, शिक्षण, जनजागृती आणि तंत्रज्ञानाधारित प्रतिबंध यांचा संगम घडवून ती अधिक सुलभ, समजण्यास सोपी आणि कृतीक्षम करण्याचे ध्येय आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून, येत्या काही महिन्यांत I4C आणि अमेझॉन राष्ट्रीय तसेच प्रादेशिक स्तरावर विविध उपक्रम राबवतील. यात गुंतागुंतीच्या फसवणूक प्रकारांना सोप्या आणि समजण्यासारख्या सुरक्षा टिप्समध्ये बदलणारी सोशल मीडिया सामग्री, लाखो घरांपर्यंत पोहोचणाऱ्या सुरक्षा सूचना असलेले डिजिटल जाहिराती, प्रत्येक डिलिव्हरीला वैयक्तिक सुरक्षा संदेशात रूपांतरित करणारी अमेझॉन पॅकेजेसमधील शैक्षणिक पत्रके, सणासुदीच्या खरेदी हंगामात ग्राहकांना सुरक्षित खरेदीसाठी मार्गदर्शन करणारे ‘स्कॅम-फ्री सप्टेंबर’ उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला बहुभाषिक टिप्स आणि फसवणूक ओळख व प्रतिबंधासाठी एआय-आधारित उपाय विकसित करण्यासाठी राष्ट्रीय हॅकाथॉन यांचा समावेश आहे.
फसवणूक कशी ओळखावी
I4C चे संचालक श्री निशांत कुमार म्हणाले, “सणासुदीच्या काळात खरेदी हा प्रत्येक भारतीय कुटुंबाचा नैसर्गिक भाग असतो. पण याच काळात फसवणूक करणाऱ्यांची हालचालही वाढते आणि ते विशेषत: पहिल्यांदाच इंटरनेट वापरणारे ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक अशा असुरक्षित गटांना फसवण्याचा प्रयत्न करतात. अमेझॉनसोबतची ही भागीदारी ग्राहकांना फसवणूक कशी ओळखावी आणि त्याच्या जाळ्यात अडकण्यापासून कसे वाचावे याबाबत जागरूक करेल. भारतात अमेझॉनसोबत मिळून ऑनलाईन फसवणूक रोखणे आणि सुरक्षित खरेदीचा अनुभव उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाला पुढे नेण्यासाठी आम्हाला आनंद होत आहे.”
कसा होतो ऑनलाईन फ्रॉड? ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी ‘या’ टीप्स फॉलो करा
ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा
अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष – लीगल, राकेश बक्षी म्हणाले, “अमेझॉनसाठी ग्राहकांचा विश्वास हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. जेव्हा फसवणूक करणारे ग्राहकांना फसवण्यासाठी प्रसिद्ध ब्रँडचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरतात, तेव्हा ते केवळ व्यवसायांचे नुकसान करत नाहीत, तर देशाच्या संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेवरील ग्राहकांचा विश्वासही कमी करतात. I4C सोबतच्या आमच्या भागीदारीतून आम्ही अशा व्यावहारिक उपाययोजना निर्माण करण्यासाठी सक्रिय पावले उचलू इच्छितो, ज्यामुळे ग्राहकांना फसवणूक ओळखता येईल, त्यापासून बचाव करता येईल आणि त्याबाबत तक्रारही करता येईल.”
ही भागीदारी सुरक्षित डिजिटल भारत घडविण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी असलेली सामूहिक बांधिलकी अधोरेखित करते. ही घोषणा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झाली आहे, कारण भारतातील निम्म्याहून अधिक फसवणूकीची प्रकरणे ऑनलाईन घडतात आणि अलीकडेच आलेल्या मॅकाफी अहवालानुसार सणासुदीच्या खरेदी हंगामात हा धोका विशेषतः तुलनेने जास्त असतो.
हा उपक्रम अमेझॉनच्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही पुढे नेतो. कंपनी देशभरात ग्राहकांना सुरक्षित ऑनलाईन खरेदी पद्धतींबाबत शिक्षित करण्यासाठी विविध औद्योगिक संस्थांसोबत सक्रियपणे काम करते आणि क्षमता वाढविणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन करते.
डिजीटल घोटाळ्याच्या जाळ्यात अडकले आहात? अशा घोटाळ्यांपासून सुरक्षिततेसाठी करा 5 महत्त्वपूर्ण उपाय