इंटरनेटचं जग बदलणार? Google वेब ब्राउझर Chrome विकणार का? जाणून घ्या आतापर्यंतच्या सर्व अपडेट्स
टेकजायंट कंपनी गुगल त्यांचा वेब ब्राऊझर क्रोम विकणार आहे, अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र आता गुगलला त्याचा वेब ब्राऊझर क्रोम विकावा लागणार असल्याचे संकेत दिसत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) गुगलविरुद्धची भूमिका आणखी कडक केली आहे. इंटरनेट जगात गुगलची मक्तेदारी कमी करण्यासाठी गुगलला त्याचा वेब ब्राउझर क्रोम विकावा लागेल, अशी मागणी डीओजेने न्यायालयाकडे केली आहे.
खरं तर जगभरातील गुगलच्या वर्चस्वाबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. इंटरनेटच्या जगात गुगल राज्य करत आहे. अगदी एखाद्या सामान्य माणसापासून दिग्गजांपर्यंत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी लोकं गूगलची मदत घेतात. गूगलकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, असं मानलं जातं. त्यामुळे गुगलचे हजारो, लाखो नाही तर करोडो युजर्स आहेत. अशा या करोडो युजर्स असणाऱ्या मोठ्या टेक कंपन्यांचा दबदबा कमी करण्यासाठी आणि त्यांना लगाम घालण्यासाठी डीओजेने हे पाऊल उचललं आहे. डीओजेचे हे पाऊल माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या धोरणाचा एक भाग आहे. जर गुगलने क्रोम विकले तर निश्चितच त्याच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. शिवाय इंटरनेटच्या जगातील गुगलचे वर्चस्व देखील कमी होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंटरनेट जगत आणि सर्च इंजिनमध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी गुगलने अनेक चुकीच्या पद्धती अवलंबल्या आहेत, असे अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपमधील वेब ब्राउझरमध्ये गुगल सर्चला डीफॉल्ट सर्च इंजिन म्हणून सेट करण्यासाठी कंपन्यांना अब्जावधी रुपये दिल्याचा आरोप गुगलवर आहे. डीओजेचा दावा आहे की अमेरिकेत 70% पेक्षा जास्त सर्च रिजल्ट्स गुगल नियंत्रित करते. गुगलच्या या रणनीतीमुळे, लहान सर्च इंजिन स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
आपण आपल्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा विचार केला तर त्यामध्ये गुगल आधीपासूनचं इंस्टॉल केलेलं असतं. यामुळेच आता अनेक समस्या निर्माण होत आहेत. डीओजेने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे की या धोरणांमुळे गुगल खूप शक्तिशाली झाले आहे. त्याने बाजारपेठेवर इतके वर्चस्व गाजवले आहे की स्पर्धक कंपन्या काहीही केल्या तरी गुगलविरुद्ध जिंकू शकत नाहीत. त्यामुळेच गुगलचं वर्चस्व कमी करणं अत्यंत गरजेचं आहे.
इंटरनेट आणि सर्च इंजिन क्षेत्रातील गुगलची वाढती मक्तेदारी कमी करण्यासाठी, गुगलने आपला व्यवसाय कमी करावा, असे डिओजीने सुचवले आहे. यासाठी गुगलला त्यांचा वेब क्रोम ब्राउझर विकावा लागेल, अशी दाट शक्यता आहे. यासोबतच, गुगलला अॅपल, मोझिला आणि इतर कंपन्यांसोबतची सर्च इंजिन भागीदारी देखील थांबवावी लागेल. यासोबतच, डीओजे असेही म्हणते की इतर कंपन्यांना गुगलच्या सर्च रिजल्ट्समध्ये आणि डेटामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे.
HMD Barbie Flip Phone: Nokia लवकरच भारतात लाँच करणार पिंक फोन, लाँचपूर्वीच फीचर्स लीक!
गुगलने डीओजेच्या मागण्यांना तीव्र विरोध केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते इतर कंपन्यांसोबतच्या करारांमध्ये काही बदल करू शकते. यासोबतच, गुगल असेही म्हणते की डीओजेच्या मागण्या युजर्ससाठी, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असू शकतात. गुगलच्या मक्तेदारी प्रकरणाची सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे. गुगलने आधीच स्पष्ट केले आहे की जर या प्रकरणातील निर्णय त्यांच्या विरोधात आला तर ते उच्च न्यायालयात अपील करेल. मात्र क्रोमच्या विक्रीबाबत गुगलने अद्याप काहीही सांगितलं नाही.