iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral
गेल्या अनेक दिवसांपासून टेक जायंट Apple च्या आगामी आयफोनची प्रचंड चर्चा आहे. आगामी आयफोन 17 सिरीज सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार आहे. या आगामी आयफोनचे डिझाइन कस असणार याबाबत कंपनीने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. मात्र या पोस्टमध्ये केवळ चित्र बनण्यात आलं होतं ज्यामध्ये आयफोनच्या डिझाईनची कल्पना युजर्सना देण्यात आली होती. मात्र आता या आगामी आयफोन 17 सिरीजचा पहिला लूक समोर आला आहे. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
आगामी आयफोन 17 चा हा लूक पाहून नक्कीच प्रत्येक स्मार्टफोन युजर त्याच्या प्रेमात पडेल. येत्या सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारण म्हणजे Apple नेहमीच त्यांची नवीन स्मार्टफोन सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच करते. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की आगामी सीरिज देखील सप्टेंबरमध्ये लाँच केली जाऊ शकते. (फोटो सौजन्य – X)
या आगामी 17 सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max या डिव्हाईसचा समावेश असण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, या सर्व मॉडेल्ससह एक नवीन मॉडेल देखील लाँच केला जाऊ शकते. हे मॉडेल iPhone 17 Air नावाने लाँच केलं जाऊ शकतं. आगामी आयफोनमध्ये अपडेटेड A19 प्रोसेसर, अधिक चांगली बॅटरी लाइफ, अपग्रेडेड कॅमेरा फीचर आणि बरंच काही पहायला मिळू शकत.
In China, a store is using the CAD models I provided to show people how the various iPhone 17 models differ from older models pic.twitter.com/ZVug7ksAWC
— Majin Bu (@MajinBuOfficial) April 21, 2025
सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आगामी आयफोनची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे की, चीनमध्ये एका स्टोअरमध्ये कंप्यूटर एडेड डिजाइन म्हणजेच CAD मॉडलचा वापर करून दाखवलं जात आहे. यामुळे आगामी आयफोन जून्या मॉडेलपेक्षा किती वेगळा आहे हे लोकांना समजू शकते.
व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अपकमिंग iPhone 17 Air ला हातात घेऊन दाखवले आहे. तर इतर मॉडेल टेबलवर पाहायला मिळत आहेत. Majin Bu ने त्याच्या X अकाउंटवर हा कथित व्हिडिओ शेअर केला. पूर्वीच्या मॉडेल्सचा विचार केला तर आगामी आयफोन सीरिजमधील मॉडेल्सची रचना बरीच वेगळी असणार आहे. पातळ आणि हलक्या आयफोन 17 एअर डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे, परंतु प्रो मॉडेल्समध्ये देखील अपडेट्स दिसतील, विशेषतः मागील कॅमेऱ्याचा लूक पूर्णपणे बदलणार आहे.
लीकवरून असे सूचित होते की Apple आयफोन 17 एअर, प्रो आणि प्रो मॅक्समध्ये नवीन कॅमेरा बार डिझाइन वापरू शकते. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी असेही सांगितले आहे की आयफोन 17 प्रो मध्ये सिंगल-कलर बॅक असेल. अहवालांमध्ये असेही सूचित केले आहे की आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये दोन-टोन बॅक असू शकतो, ज्याचा कॅमेरा क्षेत्र फोनच्या इतर भागांपेक्षा वेगळा रंग असू शकतो.