iPhone युजर्स लक्ष द्या! 30 सप्टेंबरनंतर नाही होणार कॉल रिकॉर्डिंग, Truecaller ने केली घोषणा; काय आहे निर्णयाचं कारण?
आयफोन युजर्ससाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. आयफोन युजर्स आता कॉल रेकॉर्डिंग करू शकणार नाहीत. कारण Truecaller ने घोषणा केली आहे की, कंपनी आता लवकरच iPhone यूजर्ससाठी सुरु करण्यात आलेलं कॉल रिकॉर्डिंग फीचर बंद करणार आहे. 30 सप्टेंबर 2025 नंतर युजर्स या फीचरचा वापर करू शकणार नाहीत. ट्रूकॉलरचे ios प्रमुख नकुल काबरा यांनी देखील या घोषणेची पुष्टी केली आहे. त्यामुळे जे युजर्स कॉल रिकॉर्डिंग फीचरचा वापर करत होते, त्यांच्यासाठी हे अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ट्रूकॉलरचे ios प्रमुख नकुल काबरा यांनी माहिती दिली आहे की, कंपनीने iOS वरून कॉल रेकॉर्डिंग फीचर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लाईव्ह कॉलर आयडी आणि ऑटोमॅटिक स्पॅम कॉल ब्लॉकिंग सारख्या फीचर्समुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यावर लक्ष केंद्रित करता येईल. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सवर परिणाम होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जून 2023 मध्ये iPhone यूजर्ससाठी Truecaller Call Recording Feature सुरु करण्यात आलं होतं. हे फीचर युजर्ससाठी सुरुवातीपासूनच पेड होते. तथापि, नंतर ते अँड्रॉइड यूजर्ससाठी पेड करण्यात आले. मात्र Apple कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी देत नाही. अशावेळी कंपनीला एका अशा लाईनचा वापर करावा लागला जी कॉलमध्ये विलीन करता येऊ शकते. काबरा यांनी म्हटलं आहे की या पद्धतीमुळे त्यांच्यासाठी केवळ समस्या निर्माण तसेच यासाठी मोठा खर्च देखील करावा लागला. याच सर्वाचा विचार करून आता हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
X प्लॅटफॉर्मवर अनेक ट्रूकॉलर यूजर्सना एक नोटिफिकेशन शेयर करण्यात आली आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ‘आम्ही आयफोनसाठी ट्रूकॉलरवरील कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद करत आहोत.’ एका पॉप-अप मॅसेजमध्ये युजर्सना याबाबत सूचना देण्यात आली आहे. या सूचनेमध्ये सांगण्यात आलं आहे की, जे युजर्स वारंवार कॉल रेकॉर्डिंग फीचरचा वापर करत आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. युजर्सनी त्यांचे रेकॉर्डिंग डाउनलोड करावे, कारण 30 सप्टेंबरनंतर तुमचा सर्व डेटा अॅपनधून डिलीट केला जाणार आहे. युजर्स काही सोप्या स्टेप्स फॉलो करून कॉल रेकॉर्डिंग डाऊनलोड करू शकतात.
Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स
नकुल काबरा कोण आहेत?
ट्रूकॉलरचे ios प्रमुख
आयफोन युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंग फीचर कधी बंद होणार?
30 सप्टेंबर 2025