OMG! सिंगल चार्जवर देणार 47 तासांची बॅटरी लाईफ... iQOO TWS Air 3 Pro ईयरबड्सची दमदार एंट्री, किंमत जाणून घ्या
iQOO TWS Air 3 Pro चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटध्ये कंपनीने iQOO Z10 Turbo+ 5G स्मार्टफोनसह iQOO TWS Air 3 Pro ईअरबड्स लाँच केले आहेत. या ईअरबड्सची सर्वात खास गोष्ट म्हणजेच त्याची बॅटरी. कंपनीने दावा केला आहे की, हे ईअरबड्स चार्जिंग केससह 47 तासांची बॅटरी लाईफ देतात. त्यामुळे तुम्हाला सतत ईअरबड्स चार्जिंग करावे लागत नाहीत.
iQOO TWS Air 3 Pro मध्ये 12mm ड्राइवर्स आहे आणि 50dB पर्यंत अॅक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) सपोर्ट आहे. ईअरबड्स आणि स्मार्टफोनसोबतच कंपनीने या ईव्हेंटमध्ये 10,000mAh लिथियम पॉलिमर बॅटरी वाला पावर बँक देखील सादर केला आहे. ज्यामध्ये इन-बिल्ट केबल, L-शेप्ड यूएसबी टाइप-C पोर्ट डिझाईन आणि 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या स्मार्टफोनसाठी पावर बँक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा पावर बँक बेस्ट ऑप्शन आहे. (फोटो सौजन्य – X)
iQOO TWS Air 3 Pro चीनमध्ये CNY 199 म्हणजेच सुमारे 2,400 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हे Vivo चीनच्या ई-स्टोअरमधून स्टार डायमंड व्हाइट आणि स्टार यलो रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. जर iQOO Z10 टर्बो + 5G सह खरेदी केले तर त्याची किंमत CNY 159 म्हणजेच सुमारे 1,900 रुपये होणार आहे. तर iQOO चा 22.5W 10,000mAh पावर बँक स्टारी येलो कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी लाँच करण्यात आला आहे. याची सुरुवातीची किंमत CNY 99 म्हणजेच सुमारे 1,200 रुपये आहे. हे डिव्हाईस देखील कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतो.
iQOO TWS Air 3 Pro मध्ये ट्रेडिशनल इन-ईयर डिझाईन आणि सिलिकॉन ईयर टिप्स देण्यात आले आहे. प्रत्येक ईयरफोनमध्ये 12mm चे डायनामिक ड्राइवर्स आहेत आणि हे 50dB पर्यंत अडाप्टिव ANC ला सपोर्ट करतात, ज्यामध्ये ट्रांसपेरेंसी आणि माइल्ड मोड्स देखील देण्यात आले आहेत. यामध्ये कॉलदरम्यान नॉइज रिडक्शनसाठी तीन माइक्रोफोन देण्यात आले आहेत.
हे TWS हेडसेट DeepX 3.0 स्टीरियो साउंड टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात आणि बिल्ट-इन गेमिंग मोडसह 44ms पर्यंत लो लेटेंसी देतात, ज्यामुळे ऑडिओ लॅग कमी होतो. हेडसेटमध्ये Bluetooth 6.0, मल्टी-डिवाइस कनेक्टिविटी आणि SBC, AAC आणि LC3 ऑडियो कोडेक्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.
चार्जिंग केससह iQOO TWS Air 3 Pro ची बॅटरी लाइफ 47 तासांपर्यंत वाढवली जाऊ शकते. केवळ ईयरबड्स 9.5 तासांपर्यंत चालतात. या डिव्हाईसला IP54 रेटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे हे डिव्हाईस धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहू शकते. प्रत्येक ईयरफोनचे वजन सुमारे 3.8 ग्राम आहे, तर केससह ईअरबड्सचे एकूण वजन 38 ग्रॅम आहे.