गेमर्ससाठी iQOO घेऊन आलाय जबरदस्त स्मार्टफोन! फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार पावरफुल प्रोसेसर; हे आहेत कलर ऑप्शन
iQOO चा नवीन गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अनेक रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी आणि दमदार प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या किंमतीचा विचार केला तर या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 28,000 रुपये आहे. त्यामुळे ज्या लोकांना नवीन आणि दमदार गेमिंग स्मार्टफोन पाहिजे असेल अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन बेस्ट आहे.
iQOO Z10 Turbo+ 5G स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+256GB, आणि 16GB+512GB या व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 12GB+256GB व्हेरिअंटसाठी CNY 2,299 म्हणजेच 28,000 रुपये आहे. तर 12GB+512GB व्हेरिअंटची किंंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 32,900 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 30,500 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 36,500 रुपये आहे. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये पोलर एश, यूनहाई व्हाइट आणि डेजर्ट यांचा समावेश आहे. ग्राहक ते कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
iQOO Z10 Turbo+ Launched
6.78″ TCL C9+ 1.5K 144Hz Flat OLED
5500nits Peak
Dimensity 9400+
50MP LYT-600 (OIS)+ 8MP UW
16MP Front
8000mAh + 90W
LPDDR5X Ultra
UFS 4.1
7000mm² Cooling
Optical Fingerprint
Android 15
IP65
IR Blaster
Wi-Fi 7
BT 5.4
NFC
8.16mm
212g12+256GB – 2199¥ pic.twitter.com/1IWy4T8Ovr
— Sufiyan Technology (@RealSufiyanKhan) August 7, 2025
ड्यूल सिम वाला iQOO Z10 Turbo+ 5G फोन OriginOS 5 वर चालतो, जो Android 15 वर बेस्ड आहे. यामध्ये 6.78-इंचाची AMOLED टचस्क्रीन आहे, जी 20:9 एस्पेक्ट रेशियो, 93.42% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 2,800×1,260 पिक्सेल रेजोल्यूशन आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करतो. डिस्प्लेमध्ये HDR टेक्नोलॉजी आणि 1.07 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. यात 3.73GHz च्या पीक क्लॉक स्पीडसह 3nm प्रक्रियेवर बनवलेला ऑक्टा कोर MediaTek Dimensity 9400+ प्रोसेसर आहे. गेमिंगसाठी, यात Immortalis-G925 GPU आहे.
फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा f/1.79 Sony मेन सेंसर आणि 8MP चा f/2.2 अल्ट्रा-वाइड अँगल लेंस देण्यात आले आहे. फ्रंटला 16MP चा f/2.45 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करतो आणि तो डॉक्युमेंट स्कॅनिंगसाठी देखील वापरला जाऊ शकतो. यात 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि 1080p स्लो मोशन रेकॉर्डिंगचा पर्याय देखील आहे.
फोनमध्ये 8000mAh बॅटरी आहे, जी USB Type-C Gen 2 पोर्टद्वारे 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी यामध्ये Bluetooth 5.4, Wi-Fi 7, GPS, Beidou, GLONASS आणि Galileo चा सपोर्ट देण्यात आला आहे.