JioHotstar Subscription: 'ही' कंपनी देतेय OTT प्लेटफॉर्म JioHotstar चं फ्री सब्सक्रिप्शन? फक्त करावं लागणार हे काम
JioCinema आणि Disney+ Hotstar यांच्या विलीनीकरणानंतर JioHotstar नावाचं ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आलं आहे. 14 जानेवारीपासून JioHotstar लाईव्ह झालं आहे. सध्या हे ओटीटी प्लॅटफॉर्म युजर्ससाठी मोफत उपलब्ध असले तरी देखील काही दिवसांतच त्याचे सबस्क्रीप्शन सुरु केले जाणार आहे. कंपनीने यासाठी काही सबस्क्रीप्शन प्लॅन देखील लाँच केले आहेत. शिवाय ज्या युजर्सचे JioCinema आणि Disney+ Hotstar चे जुने सबस्क्रीप्शन शिल्लक आहे, त्यांचे सबस्क्रीप्शन JioHotstar या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु ठेवले जाणार आहे.
तुम्हाला JioHotstar चं सबस्क्रीप्शन खरेदी करायचं नसेल तर तुम्ही ते फ्रीमध्ये देखील मिळवू शकता. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ आपल्या युजर्सना ही संधी देत आहे. जिओच्या रिचार्ज प्लॅनवर युजर्सना नव्याकोऱ्या JioHotstar ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रीप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे. जिओ त्यांच्या एका रिचार्ज प्लॅनमध्ये या ओटीटी प्लॅटफॉर्मचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. याद्वारे तुम्ही पैसे खर्च न करता तुमच्या मोबाईलवर आयपीएल सामने पाहू शकाल. जिओच्या या प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
जिओच्या 949 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या कालावधीत, वापरकर्त्यांना दररोज 2 जीबी म्हणजेच एकूण 168 जीबी डेटा मिळेल. यासोबतच, मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. 5G यूजर्सना काळजी करण्याची गरज नाही आणि त्यांना प्लॅनच्या व्हॅलिडीटीदरम्यान अमर्यादित डेटा मिळत राहील. या योजनेसह, कंपनी नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म JioHotstar चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील देत आहे. जिओच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवस असली तरी, JioHotstar सबस्क्रिप्शन पूर्ण 90 दिवसांसाठी असेल. या काळात, तुम्ही तुमच्या मोबाईलवर आयपीएल सामन्यांचा मोफत आनंद घेऊ शकाल.
जिओचा हा प्लॅन युजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण या एका प्लॅनमध्ये युजर्सना JioHotstar सबस्क्रिप्शन आणि रिचार्ज प्लॅनच्या सुविधा देखील मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन खरेदी करायचे नसेल तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे.
जिओच्या या प्लॅनला टक्कर देण्यासाठी Airtel 979 रुपयांचा प्लॅन घेऊन आला आहे. 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीच्या या प्लॅनमध्ये, युजर्सना दररोज 2GB डेटा, 100 SMS, अनलिमिडेट कॉलिंग आणि 5G डेटा ऑफर केला जात आहे. यासोबतच, कंपनी दरमहा मोफत स्पॅम अलर्ट आणि मोफत हॅलोट्यून्सची सुविधा देखील देत आहे. या पॅकसह, युजर्सना एअरटेल एक्स्ट्रीम प्लेचे प्रीमियम सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याद्वारे, सोनी लिव्ह, चौपाल, लायन्सगेट, होई-चोई आणि सननेक्स्टसह 22 ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेंट अॅक्सेस करता येईल.
जिओहॉटस्टार दर महिन्याला 2-3 नवीन शो आणि दर तिमाहीत 2 मोठे चित्रपट लाँच करेल. क्रिमिनल जस्टिस आणि असुर सारख्या लोकप्रिय फ्रँचायझी याचा भाग असतील. जिओ स्टारचे उद्दिष्ट मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवर एक चांगला लाईव्ह स्पोर्ट्स अनुभव प्रदान करणे आहे, जेणेकरून अधिकाधिक प्रेक्षक कनेक्ट होऊ शकतील.