प्रतिकात्मक फोटो
मुंबई : ॲमेझॉन इंडियाने (Amazon India) ‘बॅक टू स्कूल’ (Back To School) ची घोषणा केली, जे सर्व विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेले स्टोअर विविध श्रेणींमध्ये उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर विविध डील ऑफर (Deals Offer) करते. ग्राहकांना एचपी (HP), असुस (ASUS), ऑनर(HONOR), शाओमी आणि डेल (Xiaomi Dell) यांसारख्या उत्तम ब्रँड्सचे अभ्यास आणि लेखन आवश्यक गोष्टी, स्टेशनरी, लॅपटॉप (Laptop), टॅब्लेट आणि पीसी, हेडसेट आणि स्पीकर, प्रिंटरवर 40% पर्यंत सूट मिळू शकते. ‘बॅक टू स्कूल’ 12 जून 2022 पर्यंत लाइव्ह असेल.
Amazon.in ने हे सुद्धा सांगितले की, महाराष्ट्र हे इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत लॅपटॉप च्या मागणी मधील सर्वात जास्त मागणी असलेले राज्य आहे. कंपनीने तीच्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे आणि 30 हजार, 35 हजार, 45 हजार, 70 हजार यापेक्षा कमी किंमतीच्या सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या अत्याधुनिक उत्पादनांची जोडणी केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई हे राज्यात लॅपटॉप साठी अतिरीक्त वाढ होणारे मोठे शहर आहेत तसेच कल्याण, औरंगाबाद, लातुर, सातारा, भुसावळ आणि अलिबाग यांसारखे लहान शहर सुद्धा आहेत. ॲमेझॉन इंडियाने Amazon.in वर लॅपटॉपचा शोध दुप्पट झाल्याचेही सिद्ध केले आहे.
ॲमेझॉन इंडियाचे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अक्षय आहुजा म्हणाले, “गेल्या 2 वर्षांमध्ये, वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम असलेल्या ग्राहकांनी वाढत्या प्रमाणात लॅपटॉप बदलले आहेत. आता शैक्षणिक संस्था सुरू झाल्यामुळे या प्रदेशातून लॅपटॉपच्या मागणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील ग्राहक Amazon.in वर लॅपटॉप खरेदी करत आहेत आणि फायनान्स स्कीम जसे की नो-कॉस्ट ईएमआय आणि बरेच काही वापरत आहेत. Amazon.in वर उपलब्ध असलेल्या लॅपटॉपच्या विविध किमतीच्या श्रेणींमध्ये ते निवडत आहेत आणि फास्ट डोअरस्टेप (घरी) डिलीव्हरी लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे, Amazon.in वर प्रीमियम/मध्यम-रेंज लॅपटॉप ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आम्ही ग्राहकांना त्यांच्या घरीच सुरक्षित आवश्यक ते सर्व शोधण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”
आम्ही ऑनर, रेडमी, एचपी आणि लेनोवो यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या एंट्री लेवल लॅपटॉप साठी मोठी मागणी होत असल्याचे साक्षीदार आहोत. महत्वाचे म्हणजे, आम्ही एंट्री लेवल स्मार्टवॉच सह रॅम, एचडीडी आणि प्रिंटर इंक यांसारख्या पीसी कंपोनंट्स ची सुद्धा वाढती मागणी बघत आहोत.






