social media Outage in US: तब्बल 7 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन, जगभरातील युजर्सवर परिणाम! एक्सवर करतायत तक्रार
27 फेब्रुवारी रोजी आज अमेरिकेत अचानक सर्वात मोठा सोशल मीडिया आऊटेज निर्माण झाला आहे. गुगल, फेसबूक, युट्यूब, नेटफ्लिस सह 7 ऑनलाईन सेवा अचानक डाऊन झाल्या. त्यामुळे युजर्स वैतागले आहेत. आज सकाळी, अमेरिकेतील अनेक प्रमुख ऑनलाइन सेवा आणि अॅप्सनी अचानक काम करणे थांबवले, ज्यामुळे हजारो युजर्सना समस्यांना तोंड द्यावे लागले. या यादीमध्ये गुगल, यूट्यूब, फेसबुक, नेटफ्लिक्ससह 7 प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. युजर्सनी नोंदवले की त्यांना लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. तसेच अनेकांना सर्व्हर कनेक्शन बिघाड आणि वेबसाइट त्रुटी यासारख्या समस्या येत आहेत.
युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. एक्सवर अनेक युजर्सनी रात्री देखील पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये गुगल डाऊन असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेक सोशल मीडिया युजर्सना रात्रीपासूनच या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार, हजारो युजर्सना या समस्यांचा सामना करावा लागला आणि त्यांनी त्याबद्दल तक्रार केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
फेसबूक बाबत 18,000 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे. Netflix बाबत 850 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे. YouTube 600 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे. Google बाबत 300 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे. Discord बाबत 700 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे. Xbox Network बाबत 450 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे. PlayStation Network बाबत 300 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे.
Me checking on twitter to confirm whether instagram is actually down pic.twitter.com/Hjw9sBN9vY
— Nirav Gupta (@NiravGupta9) February 26, 2025
is instagram down pic.twitter.com/IUxCuC3igk
— tan (@pokpokesa) February 26, 2025
Seems like Netflix is down tonight. pic.twitter.com/W0GSIFq8e6
— Dysto (@RealDysto) February 27, 2025
Having a craptastic tech day: Slack up and down, Google workspace up and down and I spilled liquid on my detached keyboard and didn’t detach it from my MS Surface fast enough. Put a fork in me I’m done. pic.twitter.com/hAOhirjELh
— Laura Byrne (@NewYorkerLaura) February 26, 2025
Anyone else accidentally try googling why google is down?
— Ryan McGowan 🆒 (@AtomicDoor) February 27, 2025
Facebook web is down pic.twitter.com/1goqmZXdvN
— James Jansson (@jamesjansson) February 27, 2025
Everyone going towards Twitter to check if Instagram is down… #instagramdown#facebookdownpic.twitter.com/rUIMA7wHBu
— Rajjj (@CFC_Rajjjjjjj) February 26, 2025
Anyone else getting this message on Facebook? #Facebookdown pic.twitter.com/n998UYqAv4
— ᴿᵒᵇⁱⁿ ᵂʰᵒ?🇬🇷🇺🇸 (@TheRealRobinWho) February 27, 2025
हे सर्व अॅप्स आणि वेबसाईट का डाऊन झाले, याच कारण अद्याप समजलेले नसले तरी, काही तंत्रज्ञान तज्ञांचा असा विश्वास आहे की, हे इंटरनेट सेवा प्रदात्यांशी (ISP) किंवा क्लाउड नेटवर्कशी संबंधित समस्येमुळे ही समस्या निर्माण झाली असावी. आतापर्यंत कोणत्याही कंपनीने या समस्येची दखल घेतलेली नाही. काही सेवा हळूहळू पूर्ववत होत असल्या तरी, अनेक युजर्स अजूनही समस्यांबद्दल तक्रार करत आहेत.
भारतातील फेसबूक युजर्सना देखील डाऊनचा सामना करावा लागत आहे. फेसबुक डाउन झाल्यामुळे आज जगभरातील हजारो युजर्सना समस्यांना तोंड द्यावे लागले. आज सकाळी 07:36 वाजता तांत्रिक बिघाड सुरू झाला, ज्यामुळे लॉगिन, फीड अॅक्सेस आणि मेसेजिंग सेवांवर परिणाम झाला. डाउनडिटेक्टरच्या मते, 18,000 हून अधिक तक्रारी आल्या होत्या, ज्यामध्ये फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्राम मेसेजिंगवरही परिणाम झाला होता.
तक्रार करणाऱ्या युजर्सपैकी 87 टक्के युजर्सनी सांगितले की ते फेसबुक वेबसाइट अॅक्सेस करू शकत नाहीत. त्याच वेळी, 10 टक्के युजर्सना त्यांच्या खात्यात लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. याशिवाय, 4 टक्के युजर्सनी तक्रार केली की ते फेसबुक अॅप योग्यरित्या वापरू शकत नाहीत. काही वापरकर्त्यांना फीड लोड करताना एक त्रुटी संदेश दिसत होता.