Meta चा मोठा निर्णय! Messenger App ‘या’ तारखेपासून होणार बंंद (Photo Credit- X)
टेक क्रंचच्या अहवालानुसार, मेटाने घोषणा केली आहे की १५ डिसेंबरनंतर डेस्कटॉपवर मेसेंजर वापरणाऱ्यांना सपोर्ट संपल्याची सूचना दिली जाईल. कंपनीने वापरकर्त्यांना हे ॲप डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे, कारण ते यापुढे वापरण्यायोग्य राहणार नाही. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, मेसेंजर ॲप स्मार्टफोनवर पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.
विंडोज आणि मॅक युजर्सकडे मेसेंजर ॲक्सेस करण्यासाठी आता खालील पर्याय उपलब्ध असतील:
डेस्कटॉप ॲप वापरणाऱ्या युजर्ससाठी मेटाने चॅट हिस्ट्री सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. वेब व्हर्जन ॲक्सेस करण्यापूर्वी युजर्सना सिक्युअर स्टोरेज (Secure Storage) सक्रिय करावे लागेल आणि चॅट हिस्ट्री सेव्ह करण्यासाठी पिन (PIN) सेट करावा लागेल. पिन सेट केल्यानंतर, जेव्हा युजर्स वेब व्हर्जन ॲक्सेस करतील, तेव्हा त्यांची चॅट हिस्ट्री तिथे उपलब्ध असेल.
सिक्युअर स्टोरेज सक्रिय करण्यासाठी स्टेप्स
तुमची चॅट हिस्ट्री सेव्ह करण्यासाठी सिक्युअर स्टोरेज सक्रिय करणे आवश्यक आहे. ते सक्रिय आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स वापरा:






