Moto G35 5G चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क, फीचर्सही आहेत भन्नाट!
Motorola ने काही महिन्यांपूर्वी Moto G35 5G हा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचा एक नवीन व्हेरिअंट भारतात लाँच केला आहे. कंपनीने नुकताच Moto G35 5G स्मार्टफोनचा 8GB रॅम व्हेरिअंट भारतात लाँच केला होता. ज्या युजर्सना अधिक चांगला परफॉर्मंस आणि जास्त स्टोरेज ऑप्शन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी हा नवीन व्हेरिअंट भारतात लाँच करण्यात आला आहे. नवीन मॉडेल लवकरच फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या व्हेरिअंटची किंमत किती आहे, जाणून घेऊया.
Motorola ने Moto G35 5G या स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 6 ऑक्टोबरपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सध्या 8,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन लीफ ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि ग्वावा रेड या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाची FHD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे. याचा अर्थ फोनची स्क्रीन मोठी आहे, ज्यामुळे व्हिडीओ पाहण्याची आणि गेम खेळण्याची मजा आणखी वाढणार आहे. फोनमध्ये 1000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. ज्यामुळे ऊन्हात देखील फोनची स्क्रीन अगदी स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. फोनमध्ये HDR10 सपोर्ट आहे. या तंत्रज्ञानामुळे व्हिडिओ आणि फोटोंचे रंग अधिक वास्तववादी आणि आकर्षक बनतात.
या स्मार्टफोनमध्ये Unisoc T760 चिपसेट देण्यात आली आहे. हा एक मिड-रेंज प्रोसेसर आहे, जो रोजच्या कामात जसे सोशल मीडिया, कॉलिंग, ब्राउजिंग आणि हलक्या गेमिंगसाठी मदत करतो.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. ज्याला एकदा चार्ज केल्यानंतर ते दिवसभराचे बॅकअप ऑफर करते.
फोनमध्ये 50MP प्राइमरी लेंस (f/1.8) आहे. जे दिवसा आणि रात्री क्लिअर फोटो क्लिक करते. 8MP अल्ट्रा-वाइड लेंस (f/2.2) कॅमेरा वाइड अँगल फोटोसाठी देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP (f/2.45) कॅमेरा देण्यात आला आहे.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये फोन अनलॉकसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. डॉल्बी अॅटमॉससह स्टीरिओ स्पीकर्स आहेत, जे ड्युअल स्पीकर्ससह 3D ध्वनीचा अनुभव देतात, ज्यामुळे संगीत आणि व्हिडिओ पाहणे अधिक आनंददायी बनते. फोनमध्ये IP52 वॉटर रेजिस्टेंस आहे, ज्यामुळे हा फोन हलक्या पावसापासून किंवा पाण्याच्या थेंबापासून संरक्षित आहे.